पुणे शहरातील रहिवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना पुणे महानगरपालिकेने जारी केली आहे. येत्या गुरुवारी दि. २३ एप्रिल २०२६ रोजी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. विविध जलकेंद्रांमधील तांत्रिक देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
ऐन उन्हाळ्यात हा त्रास रहिवाशांना होणार आहे. यात खडकवासला, पार्वती जलकेंद्रावरील कामे केली जाणार आहेत. या दुरुस्तीमुळे वडगाव, वारजे, पार्वती, चिखली, चतुःश्रृंगी, शिवाने, चांदणी चौक इत्यादी भागात पाणी पुरवठा होणार नाही. गुरुवारी पूर्ण वेळ काम चालू राहील तसेच शुक्रवारी सकाळी उशीर पाणी सुटल व ते कमी दाबाने सोडले जाईल असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी बुधवारीच मुबलक पाणी भरून ठेवावे असा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. महापालिका पाणीपुरवठा विभागाकडून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



