November 5, 2026 2:15 pm

Join WhatsApp Group
🟢

Join Our WhatsApp Group

Breaking News & Daily Updates Directly on WhatsApp

JOIN WHATSAPP GROUP
Join WhatsApp 🟢 JOIN WHATSAPP GROUP

माजी कॅबिनेट मंत्री अनंतराव थोपटे यांचे निधन

प्रतिनिधी: श्री.राजेश महांगरे ( भोर ,जि. पुणे )

राज्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री अनंतराव थोपटे यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले.

पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एक मोठी पोकळी निर्माण झाली असून, काँग्रेस पक्षाने एक निष्ठावंत आणि मार्गदर्शक नेतृत्व गमावले आहे.

अनंतराव थोपटे यांनी पुणे जिल्ह्यातील भोर विधानसभा मतदारसंघाचे अनेक वर्षे यशस्वीपणे नेतृत्व केले होते. भोर आणि परिसराच्या विकासात त्यांचा अत्यंत महत्त्वाचा वाटा होता. आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत त्यांनी राज्य मंत्रिमंडळात अनेक वर्षे कॅबिनेट मंत्री म्हणून विविध खात्यांची धुरा सांभाळली, तसेच पुण्याचे पालकमंत्री म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय काम केले होते.

पुणे जिल्ह्यात काँग्रेस पक्ष वाढवण्यात आणि तो तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यात थोपटे यांचे योगदान मोठे होते. विशेषतः शरद पवार यांनी काँग्रेसपासून वेगळे होऊन राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली, त्या कठीण काळात अनंतराव थोपटे यांनी काँग्रेसचे विधीमंडळातील गटनेते म्हणून पक्षाची धुरा सांभाळली आणि जिल्ह्यात काँग्रेसची पाळेमुळे घट्ट ठेवली. त्यांच्या निधनाबद्दल राजकीय आणि सामाजिक स्तरातून तीव्र दुःख व्यक्त केले जात आहे.

shivshahilive
Author: shivshahilive

राशिफल
सोने चांदी
हवामान
क्रिकेट