November 5, 2026 12:17 pm

Join WhatsApp Group
🟢

Join Our WhatsApp Group

Breaking News & Daily Updates Directly on WhatsApp

JOIN WHATSAPP GROUP
Join WhatsApp 🟢 JOIN WHATSAPP GROUP

टाकळीहाजी येथे ग्रामसभेच्या ऐतिहासिक ठरावाला केराची टोपली

प्रतिनिधी :प्रशांत साळवे (दिनांक 2/06/2026,मलठण )

बेकायदेशीर धार्मिक प्रार्थनेमुळे गावात तणाव! ग्रामस्थांच्या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा; ग्रामपंचायतीला जाहीर पत्र पुणे/ शिरूर
शिरूर तालुक्यातील टाकळी(मळगंगा) हाजी गावामध्ये ग्रामसभेने घेतलेल्या ऐतिहासिक ठरावांची पायमल्ली करत बेकायदेशीर धार्मिक प्रार्थना आणि गर्दी जमवून गावातील सामाजिक सलोखा धोक्यात आणल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ग्रामसभेच्या निर्णयाचा स्पष्ट अवमान झाल्याने टाकळी(मळगंगा) हाजी येथील जागरूक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून, संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यासाठी ग्रामपंचायतीकडे जाहीर अर्ज सादर करण्यात आला आहे.
ग्रामसभेच्या ‘त्या’ ऐतिहासिक ठरावांचे उल्लंघन
मिळालेल्या माहितीनुसार, टाकळी(मळगंगा) हाजी गावात शांतता, सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि अनधिकृत धार्मिक कृत्यांना आळा घालण्यासाठी गेल्या वर्षी (दिनांक ३०/०५/२०२५) झालेल्या अधिकृत ग्रामसभेत ठराव क्र. ०२/०२ आणि ०४/१ सर्वानुमते मंजूर करण्यात आले होते. या ऐतिहासिक ठरावानुसार गावात विनापरवानगी कोणत्याही नवीन धार्मिक प्रार्थना स्थळाला किंवा सभेला कडक बंदी घालण्यात आली आहे.
मात्र, या अधिकृत निर्णयाला केराची टोपली दाखवत संतोष प्रभाकर ढवळे व त्यांच्या कुटुंबीयांनी गावातील अनधिकृत प्रार्थना स्थळाच्या शेजारी आपल्या घरापुढे २० ते २५ लोकांना जमवून बेकायदेशीर ख्रिश्चन प्रार्थना आयोजित केली होती. यावेळी मोठ्या प्रमाणावर ध्वनी प्रदूषण करून गर्दी जमवण्यात आली होती, ज्यामुळे गावात धार्मिक तेढ निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला होता.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्याची धाव; प्रार्थना करणारे पळाले
या बेकायदेशीर प्रकाराबाबत स्थानिक नागरिकांनी तात्काळ ग्रामपंचायतीशी संपर्क साधला. यानंतर ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने तातडीने घटनास्थळी धाव घेत संबंधितांना समज दिली. ग्रामपंचायत प्रशासनाचा हस्तक्षेप पाहताच बेकायदेशीर प्रार्थनेसाठी जमलेले लोक तेथून पळून गेले. परंतु, या घटनेमुळे गावातील शांतताप्रिय वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
ग्रामपंचायतीने स्वतः फिर्यादी होऊन ‘FIR’ दाखल करावा: नागरिकांची मागणी
या गंभीर घटनेनंतर टाकळी(मळगंगा)हाजी येथील जागरूक नागरिकांनी आणि तक्रारदारांनी मा. सरपंच आणि ग्रामसेवक यांना जाहीर अर्ज देऊन कडक कारवाईची मागणी केली आहे. या पत्राची ग्रामपंचायत कार्यालयात अधिकृत नोंद झाली असून, आवक क्रमांक १/६ (दिनांक ०१/०६/२०२६) अशी नोंद करण्यात आली आहे .
नागरिकांनी अर्जात प्रामुख्याने खालील मागण्या मांडल्या आहेत:
कारणे दाखवा नोटीस: ग्रामसभेच्या ठरावाचा अवमान केल्याप्रकरणी संतोष ढवळे व त्यांच्या कुटुंबाला तातडीने नोटीस बजावण्यात यावी.
घटनास्थळ पंचनामा: आजच्या घटनेचा अधिकृत पंचनामा करून त्याची नोंद ग्रामपंचायत दप्तरी करण्यात यावी.
पोलीसात गुन्हा (FIR): ग्रामपंचायतीने स्वतः फिर्यादी होऊन संतोष ढवळे व संबंधितांवर भारतीय न्याय संहिता (BNS) आणि प्रचलित कायद्यानुसार शिरूर पोलीस ठाण्यात अधिकृत गुन्हा दाखल करावा.
अनधिकृत बांधकाम पाडणे: ठराव क्र. ०४/१ च्या अनुषंगाने, सदर अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सुरू असलेल्या पाठपुराव्याला गती द्यावी.
तीव्र आंदोलनाचा इशारा आणि ग्रामपंचायतीची जबाबदारी:
“गावातील शांतता राखण्यासाठी ग्रामपंचायतीने यावर त्वरित व कडक कायदेशीर कारवाई करावी. ग्रामस्थांच्या या मागण्या मान्य न झाल्यास समस्त ग्रामस्थ टाकळी (मळगंगा) हाजी यांच्याकडून तीव्र प्रकारचे आंदोलन करण्यात येईल व याची सर्वस्वी जबाबदारी ग्रामपंचायत टाकळी (मळगंगा) हाजी यांची राहील,” असा स्पष्ट इशारा ग्रामस्थांनी पत्राद्वारे दिला आहे.
“ग्रामसभेचा निर्णय हा सर्वोच्च असतो. त्याचा अवमान करून गावात धार्मिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. ग्रामपंचायतीने यावर त्वरित कडक कायदेशीर कारवाई करावी,” असे टाकळी(मळगंगा) हाजी येथील जागरूक नागरिक व तक्रारदारांनी म्हटले आहे.
या घटनेमुळे टाकळी(मळगंगा)हाजी परिसरात सध्या प्रचंड संताप व्यक्त होत असून, आता ग्रामपंचायत प्रशासन आणि शिरूर पोलीस या बेकायदेशीर कृत्यांवर काय कारवाई करतात, याकडे संपूर्ण तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

shivshahilive
Author: shivshahilive

राशिफल
सोने चांदी
हवामान
क्रिकेट