November 5, 2026 2:16 pm

Join WhatsApp Group
🟢

Join Our WhatsApp Group

Breaking News & Daily Updates Directly on WhatsApp

JOIN WHATSAPP GROUP
Join WhatsApp 🟢 JOIN WHATSAPP GROUP

भोर आगारासाठी १० नवीन “राजमाता जिजाऊ” बसेसची मागणी; आमदार शंकर मांडेकर यांचे परिवहन मंत्र्यांना पत्र

प्रतिनिधी: श्री.राजेश महांगरे ( भोर ,जि. पुणे )

भोर, दि. १६ : भोर तालुक्यातील नागरिकांच्या वाढत्या प्रवासी गरजा लक्षात घेऊन भोर आगारासाठी १० नवीन “राजमाता जिजाऊ” बसेस उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार शंकर हिरामण मांडेकर यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांच्याकडे केली आहे.
याबाबत आमदार मांडेकर यांनी ६ जून २०२६ रोजी परिवहन मंत्र्यांना पत्र पाठविले आहे. पत्रात त्यांनी नमूद केले आहे की, भोर विधानसभा मतदारसंघातील भोर तालुक्यांमधील नागरिकांच्या दैनंदिन प्रवासासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एस.टी.) सेवा अत्यंत महत्त्वाची आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थी, शेतकरी, महिला, कामगार तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात एस.टी. सेवेवर अवलंबून आहेत.
महिला सन्मान योजनेनंतर एस.टी. प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून उपलब्ध बसगाड्या अपुऱ्या पडत असल्याने अनेक मार्गांवर अतिरिक्त बसेसची आवश्यकता निर्माण झाली आहे. यामुळे ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्थेवर ताण वाढत असल्याचेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
“राजमाता जिजाऊ” बसेस या आधुनिक, सुरक्षित व प्रवासी सुविधांनी युक्त असल्याने भोर आगारासाठी १० नवीन बसेस उपलब्ध झाल्यास हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, दर्जेदार आणि लोकाभिमुख होण्यास मदत होईल, असे आमदार मांडेकर यांनी म्हटले आहे.
भोर आगारासाठी १० नवीन “राजमाता जिजाऊ” बसेस मंजूर करून उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक विचार करून आवश्यक कार्यवाही करावी, अशी विनंती त्यांनी परिवहन मंत्र्यांकडे केली आहे.

shivshahilive
Author: shivshahilive

राशिफल
सोने चांदी
हवामान
क्रिकेट