November 5, 2026 11:26 am

Join WhatsApp Group
🟢

Join Our WhatsApp Group

Breaking News & Daily Updates Directly on WhatsApp

JOIN WHATSAPP GROUP
Join WhatsApp 🟢 JOIN WHATSAPP GROUP

स्व. अक्षय उर्फ बाळू (धुळा) हाके या शेतकरी युवकाला व त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी निवेदन देण्यात आले

प्रतिनिधी: प्रशांत साळवे ( मलठण, ता. शिरूर, जि. पुणे )

आज दि. १६ शिरूर तहसीलदार तसेच पोलीस निरीक्षक, शिरूर यांना स्व. अक्षय उर्फ बाळू (धुळा) हाके या शेतकरी युवकाला व त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी निवेदन देण्यात आले.
मौजे शिंदोडी, ता. शिरूर, जि. पुणे येथील स्व. अक्षय उर्फ बाळू हाके यांचा महावितरणच्या निष्काळजी व बेजबाबदार कारभारामुळे विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले असून ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे.

यापूर्वीही शिंदोडी गावातील गंभीर वीज समस्यांबाबत व महावितरणच्या गलथान कारभाराविरोधात आमरण उपोषण करण्यात आले होते. संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार निवेदने देऊन धोकादायक वीज यंत्रणेबाबत उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याने आज एका निष्पाप तरुणाचा जीव गेला आहे.
निवेदनाद्वारे खालील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत :

  • या घटनेची जिल्हास्तरीय अथवा उच्चस्तरीय स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी.
  • जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करून विभागीय कारवाई करण्यात यावी.
  • स्व. अक्षय उर्फ बाळू हाके यांच्या कुटुंबास योग्य आर्थिक नुकसानभरपाई देण्यात यावी.
  • कुटुंबातील एका पात्र सदस्यास नोकरी देण्याबाबत विचार करण्यात यावा.
  • शिंदोडी गावातील सर्व धोकादायक वीजवाहिन्या, खांब व विद्युत यंत्रणेची तातडीने तपासणी व दुरुस्ती करण्यात यावी.
  • भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात.
    एका निष्पाप तरुणाचा जीव गेला असून संबंधित कुटुंबाला न्याय मिळणे अत्यंत आवश्यक आहे. प्रशासनाने या गंभीर प्रकरणात तातडीने लक्ष घालून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
    याप्रसंगी योगेश पाटील (तालुकाप्रमुख, शेतकरी सेना, शिरूर) तसेच सामाजिक कार्यकर्ते विजय शेलार उपस्थित होते.

shivshahilive
Author: shivshahilive

राशिफल
सोने चांदी
हवामान
क्रिकेट