प्रतिनिधी: श्री.राजेश महांगरे ( भोर ,जि. पुणे )
श्री रायरेश्वर धर्मदाय संस्था (रजि.) यांच्या वतीने रायरेश्वर ते पंढरपूर पायीवारी दिंडीसाठी नव्याने तयार करण्यात आलेल्या रथाचे पूजन तसेच पादुका पूजन सोहळ्याचे आयोजन शुक्रवार, दि. १० जुलै २०२६ रोजी सकाळी ७.०० वाजता करण्यात येणार आहे.हा धार्मिक सोहळा कै. ह.भ.प. माजी आमदार संपतराव (आण्णा) जेधे यांच्या निवासस्थानी, सहजीवन हौसिंग सोसायटी, बचत भवन, ता. भोर, जि. पुणे येथे पार पडणार आहे.या पवित्र सोहळ्यास भाविक, वारकरी तसेच नागरिकांनी सपत्नीक उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन श्री रायरेश्वर धर्मदाय संस्था (रजि.) यांच्या वतीने करण्यात आले आहे. नवीन रथ व पादुकांचे पूजन झाल्यानंतर रायरेश्वर ते पंढरपूर पायीवारी दिंडीच्या पुढील धार्मिक उपक्रमांना प्रारंभ होणार असल्याची माहिती संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.



