November 5, 2026 12:17 pm

Join WhatsApp Group
🟢

Join Our WhatsApp Group

Breaking News & Daily Updates Directly on WhatsApp

JOIN WHATSAPP GROUP
Join WhatsApp 🟢 JOIN WHATSAPP GROUP

रोटरी क्लब ऑफ भोर राजगड तर्फे हस्ताक्षर सुधारणा व छत्री कॅलिग्राफी कार्यशाळा उत्साहात संपन्न

प्रतिनिधी: श्री.राजेश महांगरे ( भोर ,जि. पुणे )

रोटरी क्लब ऑफ भोर राजगड यांच्या वतीने रविवार, दि. २८ जून २०२६ ( रविवार) रोजी भोर येथील स्वप्नलोक नगरी परिसरात हस्ताक्षर सुधारणा व छत्री कॅलिग्राफी कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला विद्यार्थी, पालक आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.कार्यशाळेत मोहित पोवार ( कॅलिग्राफी कलाकार, पुणे), बोरसे सर (केंद्रप्रमुख, शिक्षण विभाग, पंचायत समिती, भोर) , तसेच कॅलिग्राफी कलाकार के. आर. धाडवे यांनी विद्यार्थ्यांना सुंदर, सुबक आणि प्रभावी हस्ताक्षर विकसित करण्यासाठी आवश्यक तंत्रांचे मार्गदर्शन केले. तसेच विविध रंगांच्या साहाय्याने छत्रीवर आकर्षक कॅलिग्राफी कला साकारण्याचे प्रात्यक्षिकही सादर करण्यात आले.या कार्यशाळेत सुमारे ९० विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्साहाने सहभाग घेतला.

या मध्ये जिजामाता इंग्लिश मिडीयम स्कूल, जिजामाता प्राथमिक माध्यमिक विद्यामंदिर वआर. आर. विद्यालय, विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल भोर तसेच विद्यार्थ्यांनी तज्ज्ञांकडून हस्ताक्षर सुधारण्याची कौशल्ये आत्मसात केली तसेच छत्रीवरील कॅलिग्राफीचा अनोखा अनुभव घेतला. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या रंगीबेरंगी कलाकृतींना पालकांकडूनही भरभरून दाद मिळाली.या उपक्रमासाठी मांडके आर्ट फाउंडेशन, शशिकला फाउंडेशन तसेच भोर स्काऊट-गाईड ओपन ग्रुप, भोर (पुणे) यांचे मोलाचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवींद्र पवार सर यांनी केले. संजय खरमरे सर यांनी उपस्थितांचे स्वागत उत्साहाने केले. रोटरी क्लब ऑफ भोर राजगडच्या अध्यक्षा सौ. राजेश्रीताई केशव शेटे यांनी विशेष मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना सुंदर हस्ताक्षर आणि कलेचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जाधव सर यांनी केले.या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. केशव शेटे, श्री. नरेंद्र विटेकर, सौ. शिंदे मॅडम (दिग्विजय क्लासेस), श्री. चोरगे सर, सौ. जयश्रीताई शिंदे(उपनगराध्यक्षा, भोर नगरपालिका भोर) तसेच श्री. पवार सर (आर. आर. विद्यालय, भोर) यांचे विशेष सहकार्य लाभले.विद्यार्थ्यांमध्ये सुंदर हस्ताक्षराची आवड निर्माण करणे, सर्जनशीलतेला चालना देणे आणि कलाविषयक जाणीव विकसित करणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश असून, हा उपक्रम विद्यार्थी, पालक आणि उपस्थित नागरिकांच्या पसंतीस उतरला.

shivshahilive
Author: shivshahilive

राशिफल
सोने चांदी
हवामान
क्रिकेट