प्रतिनिधी: श्री.राजेश महांगरे ( भोर ,जि. पुणे )
जिल्हा परिषदेच्या ” मोफत सायकल वाटप योजना”मार्फत मिळालेल्या सायकलींचे चे वितरण दूरवरून येणाऱ्या विद्यार्थिनींना करण्यात आले.
सायकलींचे वाटप काल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, टिटेघर या ठिकाणी करण्यात आले.
विद्यार्थ्यांना शाळेची ओढ लागावी व्यायामाची गोडी लागावी, शाळेमध्ये वेळेत पोचता यावे असा बहुउद्देशी उपक्रम जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला असून यातीलच एक भाग म्हणून टिटेघर शाळेतील विद्यार्थिनींना सायकलीचे वाटप करण्यात आले.
यावेळी तिथे घरच्या सरपंच सौ शशिकला नारायण नवघणे, व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष सीमा नवघणे, ध्रुव प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजीव केळकर, मुख्याध्यापक जयवंत जाधव, उपशिक्षक भाग्यश्री सुर्वे बाठे, जयदेवी मुळीक कुंजीर, सुनील जोशी तसेच नारायण नवघणे ज्ञानेश्वर भोईटे संदीप नवघणे पालक ग्रामस्थ यांची उपस्थिती होती प्रास्ताविक जाधव यांनी केले तर आभार जोशी यांनी मानले
सायकली मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला



