प्रतिनिधी: प्रशांत साळवे ( मलठण, ता. शिरूर, जि. पुणे )
मलठण येथील दगडखान व खडी क्रेशर प्रकल्पामुळे कॅनॉलचे नुकसान करून कॅनॉलच्या हद्दीचा रस्ता म्हणून बेकायदेशीर वापर करीत आहे.या खाण मालक यांच्यावर योग्य ती कारवाई होणे बाबत पत्र सामाजिक कार्यकर्ते अमोल बोऱ्हाडे यांनी कार्यकारी अभियंता नारायणगाव विभाग व उप कार्यकारी अभियंता मंचर विभाग या दोन्ही ठिकाणी दिलेले आहे.याबाबत मौजे मलटण या ठिकाणी खडी क्रेशर प्रकल्प उभे केलेले आहेत,या खडी क्रेशर प्रकल्पात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर ब्लास्टिंग होत आहे, त्यामध्ये गावातील अनेक आजारी पेशन्ट, बाल रुग्ण,फुफुसाचे गंभीर आजार, त्याच बरोबर पशुधन नष्ट होत चालेले आहे.

मलठण रस्त्याने जाणारी येणारी क्रेशर माल वाहतूक वाहने राजरोस, पणे वेग मर्यादा न पाळता ये जा करत असतात. तसेच ब्लास्टिंग मुळे मोठ्या प्रमाणावर कॅनॉल ला चिरा पडल्यामुळे गळती होऊन पाणी वाया जात आहे, सोनेसांगावी गावच्या पाण्याचा साठा असलेले सोनार मळ्यातील तळे या खाण प्रकल्प आणि कॅनल जवळ असल्यालामुळे तळ्यातील पाणी साठा गावाला पुरेसा होत नाही ऐन उनळ्याचे दिवसात गावाचा पाणी प्रश्न गंभीर झाला आहे, तसेच खाण मालकाने आपल्या विहिरीत विना परवानगी पाणी सोडले आहे. या ब्लास्टिंग मुळे बोरचे पाणी गेले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता जाणवत आहे. तसेच पाणी दूषित होऊन त्याचा परिणाम माणसांच्या व जनावरांच्या आरोग्यावर होत आहे.

मलठण या ठिकाणी खडी क्रेशर प्रकल्प सुरू करण्यापूर्वी सदर इसमांनी पाठ बंधारे विभागाची परवानगी घेतली असेल तर याची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करणे न्यायाच्या दृष्टीने आवश्यक व गरजेचे आहे. खडी क्रेशर प्रकल्पाचे मालक हे मालवाहतूक करण्यासाठी कॅनॉलच्या हद्दीच्या रस्त्याचा वापर करीत असून ते कायद्याला धरून नाही म्हणजेच बेकायदेशीर आहे या मालवाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणात कॅनॉलचे नुकसान झाले आहे.

मलठण या ठिकाणी गट नंबर 63 मध्ये 02 हेक्टर 07 आर व गट नंबर 63 मध्ये 01 हेक्टर 04 आर व सोने सांगवी गावात गट नंबर 291 मधील 01 हेक्टर 03 आर एवढे क्षेत्र आहे, सदर क्रेशर मालकांनी मोठ्या प्रमाणात कॅनॉलचे नुकसान केलेले आहे व या क्रेशर धारकांनी ज्यावेळेस खानपट्टा मंजूर केला त्यावेळेस रस्ता सुद्धा मंजूर करून घेतलेला होता, त्यामुळे कॅनॉल लगतचा रस्ता तात्काळ बंद करण्यात यावा तरी साहेबांना विनंती आहे की मलठण व सोने सांगवी येथील चालू असलेल्या खडी क्रेशर प्रकल्पामुळे गावाचे व गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे.आपले शासकीय परिपत्रक यामध्ये जो आपला 200 मीटर मध्ये दगड उत्खनन किंवा क्रेशर टाकण्यास मनाई आहे. आज पाठबधारे विभागच्या टेक्निकल टीम यांनी पाहणी करून अहवाल सादर केला आहे.



