November 5, 2026 12:14 pm

Join WhatsApp Group
🟢

Join Our WhatsApp Group

Breaking News & Daily Updates Directly on WhatsApp

JOIN WHATSAPP GROUP
Join WhatsApp 🟢 JOIN WHATSAPP GROUP

शिरूर तालुक्यातील सोनेसांगवी ग्रामपंचायतसन 2020 ते 2023 च्या मागासवर्गीय निधीत अपहार

प्रतिनिधी: प्रशांत साळवे ( मलठण, ता. शिरूर, जि. पुणे )

पुणे जिल्ह्यातील सोने सांगवी गावात प्रशासनाला लाजवेल असा प्रकार घडलेला आहे,भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजने अंतर्गत गावासाठी 10 लाख रुपयांचा निधी सामाजिक सभा मंडपासाठी मंजूर झाला होता. तो सभामंडप अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीमध्ये पूर्ण करावयाचा होता असे निर्देश संबंधित शासन निर्णयाद्वारे देण्यात आलेले होते,यामध्ये सोनेसांगवी ग्रामपंचायत ने सार्वजनिक बांधकाम खात्याला सभागृह मंजूर करण्यासाठी जे दाखले दिले होते त्या मध्ये मोठे बदल आहेत. याबाबत अमोल बोऱ्हाडे पा यांनी ग्रामपंचायत व सार्वजनिक बांधकाम खात्याला तसेच पंचायत समिती शिरूर यांच्याकडे लेखी तक्रार केली त्यामध्ये अनुसूचित जाती जमातीसाठी मंजूर झालेला सभामंडप हा वस्तीमध्ये कुठेही आढळून येत नसल्याचे निष्पन्न झाले. त्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या पत्रामध्ये स्पष्ट शब्दात सांगितले आहे सदर काम योग्य रीतीने,योग्य प्रकारे, झाल्याचे दिसून येत आहे सदरचे काम ग्रामपंचायत ने दाखवलेल्या जागेवरच करण्यात आलेले असून,प्रचलित नियमानुसार ग्रामपंचायतीने हस्तांतरित देखील करण्यात आलेले आहे. परंतु त्यांनी काम योग्य ठिकाणी झाले आहे याचा कुठेही उल्लेख केलेला नाही त्यामुळे काम चुकीचे झालेले आहे. हे प्रथम दर्शनी निदर्शनास येते . सार्वजनिक बांधकाम खात्याने अमोल बोऱ्हाडे पा यांना दिलेल्या पत्रामध्ये ग्रामपंचायत ने सभामंडप हस्तांतर केल्याचे पत्र आहे तसेच एका ठिकाणी अनुसूचित जाती जमातीचा बोर्ड लावण्याचाही फोटो आहे व ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच , व गावातील काही लोक सभामंडप उद्घाटनाच्या वेळी उपस्थित आहे याचा फोटो बांधकाम खात्याने दिलेला आहे मग सभामंडपाचे पूजन हे बौद्ध वस्तीत झाले आहे, ग्रामपंचायतने दाखवलेल्या जागेवर सभामंडप बांधला असल्याची कबुली सार्वजनिक बांधकाम विभाग दिली आहे . सभामंडपाचे भूमिपूजन करताना चा फोटो, ग्रामसेवकाने सभामंडप जर योग्य ठिकाणी झालाच नाही तर तो सभामंडप हस्तांतरितच कसा करून घेतला, सभा मंडप हा योग्य ठिकाणी न बांधल्यामुळे तालुक्यात विविध चर्चांना उदान आले आहे यामध्ये तत्कालीन सरपंच, तत्कालीन ग्रामसेवक, तत्कालीन ठेकेदार, तत्कालीन अभियंता यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न चालू आहे.

तक्रारदार अमोल बोऱ्हाडे यांनी गटविकास अधिकारी महेश डोके साहेब व पंचायत समितीच्या सभापती स्वातीताई घावटे यांच्याकडे रीतसर दाखल केलेल्या तक्रारी मध्ये अनेक नवनवीन खुलासे पुराव्यानिशी दाखल केले आहेत. यामध्ये तत्कालीन गटविकास अधिकारी, यांनी समक्ष सभा मंडपात मंजुरी देताना प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली होती का? हा सभामंडप अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीमध्ये पूर्ण करावयाचा शासन निर्देश असताना सभामंडप न होता त्या सभामंडपाचे 10 लाख रुपयांचे बिल देखील ठेकेदारास आदा झालेले आहेत.हा गैरप्रकार व भ्रष्टाचार कसा झाला याचा देखील गटविकास अधिकारी व पंचायत समिती सभापती यांना आश्चर्याचा धक्का बसलेला आहे. त्याबाबत ग्रामसेवक यांच्या मीटिंगमध्ये डोके साहेब यांनी मागासवर्गीय जि. प, वीस टक्के निधी आणि ग्रामपंचायत एकूण उत्पन्नाच्या पंधरा टक्के निधीचा यांचा योग्य वापर,योग्य ठिकाणी करावा असे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत…

सोने सांगवीतील या घटनेमुळे तत्कालीन सरपंच यांच्या कार्यकाळात मोठे घोळ असल्याचे पुरावे तसेच काही वर्षांचे मासिक मीटिंग चे रजिस्टर ग्रामपंचायत मध्ये नाही या व यासारख्या गोष्टींची पोल खोल होण्यास सुरुवात झालेली आहे सदर बाब अतिशय गंभीरा असून यामध्ये अनेक बौद्ध संघटनांनी याबाबत अमोल बोऱ्हाडे यांच्याशी पत्रव्यवहार केला असून आमचा या गोष्टीला तीव्र विरोध असल्याचे सांगितले असून चोरी गेलेल्या सभामंडप जोपर्यंत सापडत नाही व चोरी गेलेल्या सभामंडपाचे मुख्य सूत्रधार सापडून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया करावी अशी जोरदार मागणी जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे केलेली असून त्यांनी जि. प, CEO साहेब यांना व सार्वजनिक बांधकाम खात्याचे मुख्य अधिकारी यांना चौकशी करून जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याची आदेश दिलेले आहेत,यामध्ये गटविकास अधिकारी यांनी देखील चौकशी करून कारवाई करण्याचे संकेत दिलेले आहेत.त्यामुळे ग्राम पंचायत मध्ये विकास कामे करत असताना आपण योग्य विकासकामे योग्य प्रकारे व योग्य ठिकाणीच करावे हा मोठा उपदेश जाणार असून,शिरूर तालुक्यातील या सारख्या अनेक ग्रामपंचायत मध्ये असे प्रकार घडत आहेत असे ग्रामस्थ यांच्या कडून ऐकायला मिळत आहेत,योग्य ठिकाणी योग्य काम केले नाही तर त्याची शिक्षा देखील योग्य असेल असे स्पष्ट निर्देश अधिकारी वर्गाच्या तोंडून ऐकण्यास भेटत आहे.

shivshahilive
Author: shivshahilive

राशिफल
सोने चांदी
हवामान
क्रिकेट