पुणे:प्रतिनिधी: शिवशाही लाईव्ह
विकास लवांडे यांच्या वक्तव्यांमुळे धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार एका महिलेकडून दाखल करण्यात आली होती. त्याच प्रकरणात आता ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, विकास लवांडे यांना अटक होण्याच्या काही मिनिटांपूर्वीच संग्राम भंडारे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत “लवांडे यांना अटक कधी होणार?” असा सवाल उपस्थित केला होता.
संप्रदायाच्या विरुद्ध टीका करणाऱ्या विकास लवांडे यांच्यावर वाघोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती या तक्रारीच्या अनुषंगाने त्यांना अटक करण्यात आली.



