November 5, 2026 1:16 pm

Join WhatsApp Group
🟢

Join Our WhatsApp Group

Breaking News & Daily Updates Directly on WhatsApp

JOIN WHATSAPP GROUP
Join WhatsApp 🟢 JOIN WHATSAPP GROUP

शेतकरी सेनेच्या वतीने शिरूर तालुक्यातील बेट भागातील गावांमध्ये सुरू असलेल्या लोडशेडिंगच्या समस्येबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन

प्रतिनिधी: श्री.सचिन शिंदे ( ता.शिरूर,पुणे )

शिरूर तालुक्यातील बेट भागातील गावांमध्ये होणाऱ्या लोडशेडिंगमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांबाबत निवेदन महावितरण कार्यालय शिरुर यांना शिवसेनेच्या शेतकरीसेनेच्या वतिने आंदोलनाचा ईशारा.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शेतकरी सेनेच्या वतीने शिरूर तालुक्यातील बेट भागातील गावांमध्ये सुरू असलेल्या लोडशेडिंगच्या समस्येबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
शिरूर तालुक्यातील बेट भागातील अनेक गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. मलठण परिसरात विशेषतः लोडशेडिंगमुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे.
बेट भाग हा बिबट्या प्रवण क्षेत्रात येत असून, संध्याकाळी ६.०० ते रात्री १०.०० या वेळेत वीजपुरवठा खंडित केला जात आहे. या भागात यापूर्वी बिबट्याचे अनेक हल्ले झाले असून काहींना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे महिला, लहान मुले व विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.


याशिवाय सध्या शालेय परीक्षा सुरू असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही विपरीत परिणाम होत आहे.
तरी सदर भागातील वीजपुरवठा तात्काळ सुरळीत करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी सेना तालुकाप्रमुख योगेश ओव्हाळ पाटील यांनी केली आहे. तसेच, लवकरात लवकर वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास शिवसेनेच्या वतीने आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
यावेळी मलठण येथील ग्रामस्थ ॲड. संदीप शिंदे, संदीप कोठावळे, हिरामण येवले, अविनाश दंडवते, प्रशांत साळवे, अक्षय शिंदे, रोहन दंडवते आदी उपस्थित होते

shivshahilive
Author: shivshahilive

राशिफल
सोने चांदी
हवामान
क्रिकेट