November 5, 2026 1:23 pm

Join WhatsApp Group
🟢

Join Our WhatsApp Group

Breaking News & Daily Updates Directly on WhatsApp

JOIN WHATSAPP GROUP
Join WhatsApp 🟢 JOIN WHATSAPP GROUP

निरा प्रणालीतील धरणांमध्ये ५०.४९ टक्के उपयुक्त पाणीसाठा; भाटघर ४०.४४ टक्के, वीर ७७.३७ टक्क्यांवर

प्रतिनिधी: श्री.राजेश महांगरे ( भोर ,जि. पुणे )

भोर प्रतिनिधी | दि. ८ जुलै २०२६ निरा प्रणालीतील चार प्रमुख धरणांमध्ये ८ जुलै २०२६ रोजी एकूण २४,४०२ दशलक्ष घनफूट (५०.४९ टक्के) उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती पुणे पाटबंधारे विभागाने प्रसिद्ध केलेल्या अहवालातून समोर आली आहे. मागील वर्षी याच दिवशी हा साठा ७०.५३ टक्के होता. त्यामुळे यंदा पाणीसाठा तुलनेने कमी असल्याचे दिसून येत आहे.

धरणनिहाय पाहता भाटघर धरणात ९,५०४ दशलक्ष घनफूट (४०.४४ टक्के) उपयुक्त पाणीसाठा असून जलपातळी ६०९.६३ मीटर आहे. निरा देवघर धरणात ५,९२३ दशलक्ष घनफूट (५०.५० टक्के), वीर धरणात ७,२७९ दशलक्ष घनफूट (७७.३७ टक्के), तर गुंजवणी धरणात १,६९६ दशलक्ष घनफूट (४५.९६ टक्के) उपयुक्त पाणीसाठा नोंदविण्यात आला आहे.

गेल्या २४ तासांत भाटघर परिसरात ६३ मिमी, निरा देवघर येथे ९० मिमी, वीर येथे ५५ मिमी, तर गुंजवणी परिसरात १६२ मिमी पावसाची नोंद झाली. चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मिळून ६२१८ दशलक्ष घनफूट इतका येवा नोंदविण्यात आला आहे.

दरम्यान, निरा डावा कालवा ३०० क्युसेक तर निरा उजवा कालवा ८०२ क्युसेक विसर्गाने सुरू असून सिंचनासाठी नियोजनानुसार पाणी सोडण्यात येत आहे.

shivshahilive
Author: shivshahilive

राशिफल
सोने चांदी
हवामान
क्रिकेट