November 5, 2026 12:20 pm

Join WhatsApp Group
🟢

Join Our WhatsApp Group

Breaking News & Daily Updates Directly on WhatsApp

JOIN WHATSAPP GROUP
Join WhatsApp 🟢 JOIN WHATSAPP GROUP

भोर येथे श्वानांसाठी मोफत अँटी रेबीज लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न

प्रतिनिधी: श्री.राजेश महांगरे ( भोर ,जि. पुणे )

महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत तालुका लघु पशु सर्वचिकित्सालय, भोर येथे बुधवारी (ता. ८ जुलै) श्वानांसाठी मोफत अँटी रेबीज लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराला भोर शहर व तालुक्यातील पशुप्रेमी आणि श्वान मालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा परिषद पुणेच्या पशुसंवर्धन व दुग्धशाळा समितीचे सभापती अमोल नलावडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी डॉ. विकू गर्ने (उपआयुक्त, पशुसंवर्धन, पुणे), डॉ. किशोर कुमार मुळे (सहायक आयुक्त, पशुसंवर्धन), डॉ. प्रशांत डोईफोडे (पशुधन विकास अधिकारी), डॉ. दामोदर खेडे बेदरे (पशुधन विकास अधिकारी, ओगवली), डॉ. मंगेश टिळेकर, डॉ. शाहूराज, डॉ. गजर संजय, डॉ. आल्लार, डॉ. आकाश सेनापती, डॉ. प्रकाश सणस, मनोज कुमार, डॉ. देवेंद्र तसेच पशुसंवर्धन विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. सुधीर सोनवणे, श्री. अनिल शिंदे, श्री. वाऊक मंगेश यांच्यासह सर्व कर्मचारीवृंद यांनी परिश्रम घेतले.

या शिबिरात श्वानांना मोफत अँटी रेबीज लसीकरण करण्यात आले. रेबीजसारख्या प्राणघातक आजारावर नियंत्रण मिळविणे, पाळीव व भटक्या श्वानांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे आणि नागरिकांमध्ये जनजागृती करणे हा शिबिराचा प्रमुख उद्देश होता.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी पशुपालकांना आपल्या पाळीव श्वानांचे नियमित लसीकरण करून त्यांची योग्य देखभाल करण्याचे आवाहन केले.

shivshahilive
Author: shivshahilive

राशिफल
सोने चांदी
हवामान
क्रिकेट