November 5, 2026 12:18 pm

Join WhatsApp Group
🟢

Join Our WhatsApp Group

Breaking News & Daily Updates Directly on WhatsApp

JOIN WHATSAPP GROUP
Join WhatsApp 🟢 JOIN WHATSAPP GROUP

रायरेश्वर ते पंढरपूर पायीवारी दिंडीचे ४८ वे वर्ष; ८ जुलैला नवीन रथासह भक्तिमय प्रस्थान

प्रतिनिधी: श्री.राजेश महांगरे ( भोर ,जि. पुणे )

भोर प्रतिनिधी : श्री रायरेश्वर धर्मदाय संस्था (रजि.), आंबवडे विभाग, ता. भोर, जि. पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात येणारी ऐतिहासिक रायरेश्वर ते पंढरपूर आषाढी पायीवारी दिंडी यंदा ४८ व्या वर्षात पदार्पण करत आहे. तब्बल चार दशकांहून अधिक काळ अखंडपणे सुरू असलेल्या या दिंडीने वारकरी परंपरेत आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.

यावर्षी दिंडीचे विशेष आकर्षण म्हणजे नवीन रथासह होणारे भक्तिमय प्रस्थान. दिंडीचा शुभारंभ बुधवार, दि. ८ जुलै २०२६ रोजी रायरेश्वर मंदिर परिसरातून हरिनामाच्या गजरात, टाळ-मृदुंगाच्या निनादात आणि वारकरी संप्रदायाच्या पारंपरिक उत्साहात झाले आहे. विविध गावांमधून हजारो वारकरी या सोहळ्यात सहभागी होऊन विठ्ठल नामाचा गजर करत पंढरपूरकडे मार्गक्रमण करणार आहेत.

सुमारे १९ दिवसांचा प्रवास पूर्ण करून ही पायीवारी दि. २६ जुलै २०२६ रोजी पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी दाखल होणार असून तेथे दिंडीची सांगता होईल.

संस्थेच्या वतीने दिंडी मार्गावरील वारकऱ्यांसाठी निवास, भोजन, वैद्यकीय मदत तसेच इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी करण्यात आली आहे. अधिकाधिक भाविकांनी या भक्तिमय सोहळ्यात सहभागी होऊन वारकरी परंपरेचा वारसा जपावा, असे आवाहन श्री रायरेश्वर धर्मदाय संस्था (रजि.) यांच्या वतीने करण्यात आले आहे.

shivshahilive
Author: shivshahilive

राशिफल
सोने चांदी
हवामान
क्रिकेट