November 5, 2026 12:20 pm

Join WhatsApp Group
🟢

Join Our WhatsApp Group

Breaking News & Daily Updates Directly on WhatsApp

JOIN WHATSAPP GROUP
Join WhatsApp 🟢 JOIN WHATSAPP GROUP

खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याची शक्यता

खडकवासला धरणातील पाणीसाठा सध्या 1.84 TMC (94%) झाला असून धरण 100% भरण्यासाठी केवळ 130 Mcft पाण्याची आवश्यकता आहे.

सध्या धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असून अंदाजे 10 मिमी पर्जन्यानंतर सुमारे 30 Mcft प्रति तास इतकी पाण्याची आवक होत आहे. विद्यमान पर्जन्यस्थिती कायम राहिल्यास धरण पुढील सुमारे 4 तासांत (अंदाजे रात्री 2.30 वाजेपर्यंत) पूर्ण क्षमतेने 100% भरण्याची शक्यता आहे.

धरण पूर्ण भरल्यानंतर अचानक मोठा विसर्ग करावा लागू नये तसेच खालच्या प्रवाहात नियंत्रित व सुरक्षित परिस्थिती राखता यावी, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आज रात्री 12.00 वाजल्यापासून खडकवासला धरणातून 800 क्युसेक्स विसर्ग नदीत सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. त्यानंतर धरणातील प्रत्यक्ष आवक, पर्जन्यमान व हवामानाचा सतत आढावा घेऊन आवश्यकतेनुसार विसर्गात टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात येईल. परिस्थितीनुसार रात्री 2.00 ते 3.00 वाजेदरम्यान 5,000 ते 8,000 क्युसेक्सपर्यंत विसर्ग करण्याची आवश्यकता निर्माण होऊ शकते.

कृपया संबंधितांनी याची नोंद घ्यावी व उचित कार्यवाही करावी.

श्री प्रविण कोल्हे अधीक्षक अभियंता,पुणे पाटबंधारे मंडळ

shivshahilive
Author: shivshahilive

राशिफल
सोने चांदी
हवामान
क्रिकेट