November 5, 2026 1:28 pm

Join WhatsApp Group
🟢

Join Our WhatsApp Group

Breaking News & Daily Updates Directly on WhatsApp

JOIN WHATSAPP GROUP
Join WhatsApp 🟢 JOIN WHATSAPP GROUP

नीरा नदीच्या पातळीत वाढ! प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

प्रतिनिधी: श्री.राजेश महांगरे ( भोर ,जि. पुणे )

भोर तालुक्यातील मावळ भागात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निरा नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाल्याने नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले

आहे.सततच्या पावसामुळे नदीपात्र पूर्ण क्षमतेने भरले असून पाण्याचा प्रवाह वेगवान झाला आहे. नदीकाठच्या सखल भागांवर प्रशासनाकडून लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांनी अनावश्यकपणे नदीपात्रात किंवा पुलांवर जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मुसळधार पावसाचा जोर कायम असल्याने नदीची पाणीपातळी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात असून परिस्थितीवर महसूल व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा बारकाईने लक्ष ठेवून आहे.

shivshahilive
Author: shivshahilive

राशिफल
सोने चांदी
हवामान
क्रिकेट