November 5, 2026 12:14 pm

Join WhatsApp Group
🟢

Join Our WhatsApp Group

Breaking News & Daily Updates Directly on WhatsApp

JOIN WHATSAPP GROUP
Join WhatsApp 🟢 JOIN WHATSAPP GROUP

राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिम रविवारी उत्साहात; पाच वर्षांखालील बालकांना पोलिओ डोस देण्याचे आवाहन

प्रतिनिधी: श्री.राजेश महांगरे ( भोर ,जि. पुणे )

भोर, दि. २८ जून (प्रतिनिधी):राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेनिमित्त आज (रविवार, २८ जून) भोर शहरात विविध केंद्रांवर पाच वर्षांखालील बालकांना पोलिओ प्रतिबंधक डोस देण्यात येणार आहे. प्रत्येक बालकाला पोलिओचा डोस देऊन पोलिओमुक्त भारताच्या संकल्पनेला बळकटी देण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

भोर शहरातील चौपाटी हनुमान मंदिर, शिवाजी हायस्कूल, भेलके वाडी विठ्ठल मंदिर, राजवाडा पंचायत समिती, एसटी स्टँड, उपजिल्हा रुग्णालय, संजय नगर गणेश मंदिर, वाघजाई नगर साई मंदिर, नागोबा आळी गणेश मंदिर, भोरेश्वर नगर मारुती मंदिर आणि नगरपालिकेजवळ पोलिओ डोस देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.आरोग्य विभागाने पालकांना आवाहन केले आहे की, आपल्या पाच वर्षांखालील प्रत्येक बालकाला जवळच्या पोलिओ केंद्रावर घेऊन जाऊन पोलिओचा डोस अवश्य द्यावा.

पोलिओमुक्त, निरोगी आणि सुरक्षित भारत घडविण्यासाठी प्रत्येक पालकाने या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

shivshahilive
Author: shivshahilive

राशिफल
सोने चांदी
हवामान
क्रिकेट