November 5, 2026 1:16 pm

Join WhatsApp Group
🟢

Join Our WhatsApp Group

Breaking News & Daily Updates Directly on WhatsApp

JOIN WHATSAPP GROUP
Join WhatsApp 🟢 JOIN WHATSAPP GROUP

पाबे घाटात भीषण अपघात : राजगड पर्यटनासाठी निघालेली ट्रॅव्हल २५ फूट दरीत कोसळली; दोन जणांचा मृत्यू, अनेक जखमी

प्रतिनिधी: श्री.राजेश महांगरे ( भोर ,जि. पुणे )

भोर/राजगड:मुंबईतील अंधेरी येथून किल्ले राजगडावर पर्यटनासाठी निघालेल्या पर्यटकांच्या ट्रॅव्हलचा आज पहाटे पाबे (ता. राजगड) घाटात भीषण अपघात झाला. घाटातील तीव्र वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल सुमारे २० ते २५ फूट खोल दरीत कोसळली.या ट्रॅव्हलमधून सुमारे २० पर्यटकांचा ग्रुप राजगडावर पर्यटनासाठी जात होता. अपघातात एका तरुणाचा आणि एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर चालकासह काही पर्यटक गंभीर जखमी झाले असून इतरांना किरकोळ दुखापत झाली आहे.अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ, पोलीस, आपत्कालीन यंत्रणा आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने बाहेर काढून उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले.या भीषण अपघातामुळे पाबे घाट परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.💐 मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली, तर जखमींना लवकरात लवकर बरे वाटावे हीच प्रार्थना.

shivshahilive
Author: shivshahilive

राशिफल
सोने चांदी
हवामान
क्रिकेट