November 5, 2026 1:06 pm

Join WhatsApp Group
🟢

Join Our WhatsApp Group

Breaking News & Daily Updates Directly on WhatsApp

JOIN WHATSAPP GROUP
Join WhatsApp 🟢 JOIN WHATSAPP GROUP

नगरसेवक जगदीश किरवे यांचा सामाजिक कार्याबद्दल गौरव

प्रतिनिधी: श्री.राजेश महांगरे ( भोर ,जि. पुणे )

भोर, प्रतिनिधी :भोर शहरातील सामाजिक, सार्वजनिक आणि लोकाभिमुख कार्यासाठी नगरसेवक जगदीश किरवे यांचा ‘स्मृती कृतज्ञता गौरव’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. भोर नगरपालिकेचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष स्व. अमृतलाल रावळ यांच्या बाराव्या स्मृतिदिनानिमित्त शरदप्रभा विकास प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित गौरव सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला.श्रीमंत गंगुबाई साहेब पंतसचिव वाचनालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात सामाजिक कार्यातील योगदानाची दखल घेत जगदीश किरवे यांना मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक भालचंद्र जगताप, भोर तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष सुभाष सोमाणी, प्रतिष्ठानचे सचिव विजय रावळ, उपनगराध्यक्ष जयश्री शिंदे, माजी नगराध्यक्ष विठ्ठल शिंदे, तृप्ती किरवे, डॉ. प्रदीप पाटील, डॉ. सुरेश गोरेगावकर, पार्थ रावळ आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी स्व. अमृतलाल रावळ यांच्या कार्याचा गौरवपूर्वक उल्लेख करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी सामाजिक बांधिलकी जपत समाजहितासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींना अशा प्रकारे सन्मानित करणे ही प्रेरणादायी बाब असल्याचे मत व्यक्त केले.

shivshahilive
Author: shivshahilive

राशिफल
सोने चांदी
हवामान
क्रिकेट