November 5, 2026 12:21 pm

Join WhatsApp Group
🟢

Join Our WhatsApp Group

Breaking News & Daily Updates Directly on WhatsApp

JOIN WHATSAPP GROUP
Join WhatsApp 🟢 JOIN WHATSAPP GROUP

कलीम सय्यद यांची शिरूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्षपदी निवड

प्रतिनिधी: प्रशांत साळवे ( मलठण, शिरूर )

शिरूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी कलीम सय्यद यांची निवड करण्यात आली. या निवडीमुळे शहरातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या संघटनात्मक कार्याला नवी ऊर्जा मिळणार असून, युवकांना संघटित करून पक्षाची विचारधारा आणि विकासाची भूमिका जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प सय्यद यांनी व्यक्त केला. आमदार माऊलीआबा कटके यांच्या मार्गदर्शनाखाली युवक संघटन बळकट करण्याचा निर्धार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मा. सुनेत्राताई अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली तसेच शिरूर-हवेलीचे आमदार मा. माऊलीआबा कटके यांच्या मार्गदर्शनाखाली युवकांसाठी विविध उपक्रम राबवून पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत करण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणार असल्याचे कलीम सय्यद यांनी सांगितले. मान्यवरांकडून अभिनंदन

कलीम सय्यद यांच्या निवडीबद्दल पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा. निलेशदादा थिगळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूर-हवेली तालुकाध्यक्ष मा. रवी बापू काळे, कात्रज दूध संघाचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक मा. स्वप्निलदादा ढमढेरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी पुणे जिल्हाध्यक्ष मा. स्वप्निलभैया गायकवाड, मा. नाना कटके, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा मा. श्रुतिका झांबरे, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा मा. तनिका ताई कर्डिले, शिरूर शहर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षा मा. पूनम मुत्याल, शिरूर शहर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष मा. उमेश जाधव तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्रपरिवार व नागरिकांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

“विश्वास हीच ताकद, युवकांची साथ हीच ऊर्जा”

यावेळी बोलताना कलीम सय्यद यांनी, “ही केवळ पदाची जबाबदारी नसून माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाची मोठी पावती आहे. आपला विश्वास हीच माझी ताकद आणि युवकांची साथ हीच माझी ऊर्जा आहे. शिरूरच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करणे हेच माझे ध्येय राहील,” अशी भावना व्यक्त केली.

युवकांची एकजूट, संघटनेची ताकद आणि शिरूरच्या विकासासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न या उद्देशाने आगामी काळात काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

shivshahilive
Author: shivshahilive

राशिफल
सोने चांदी
हवामान
क्रिकेट