November 5, 2026 12:25 pm

Join WhatsApp Group
🟢

Join Our WhatsApp Group

Breaking News & Daily Updates Directly on WhatsApp

JOIN WHATSAPP GROUP
Join WhatsApp 🟢 JOIN WHATSAPP GROUP

शिरूर शहरातील विविध प्रश्न संदर्भात १३ जुलै रोजी लहुजी शक्ती सेनेचे युवक जिल्हाध्यक्ष विशाल उर्फ बंटी जोगदंड यांचे ठिय्या आंदोलन !!

प्रतिनिधी: प्रशांत साळवे ( मलठण, ता. शिरूर, जि. पुणे )

हलगीच्या वाद्यावर पूर्ण शहर नगरपरिषदे परिसर दुमदुमून गेला होता .नगरपरिषदेवांमध्ये अचानक या आंदोलनात सुरुवात झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला ,त्यानंतर शिरूर नगर परिषदेच्या वतीने प्रशासकीय अधिकारी यांनी विनंती केली की हे आंदोलन इमारतीच्या बाहेर करावे ,इमारतीच्या आत करण्यास परवानगी नाही. यावर आंदोलन ऐकण्याच्या भाषेत नव्हते ,आंदोलकांना समजून सांगितल्यानंतर त्यांनी बाहेर भर उन्हात आंदोलन सुरू ठेवले.

दुपारी दोन ते सायंकाळी सात वाजेपर्यंत नगर परिषदेच्या बाहेर सुरू होत.या आंदोलनामध्ये लहुजी शक्ती सेनेचे विशाल रूप बंटी जोगदंड , मा.नगर सेवक दादाभाऊ लोखंडे , सुमन साळवे ,मोनिकाताई जाधव ,तुषार विश्वास पाटोळे ,अविनाश साबळे, रियाज सय्यद ,सोनू काळोखे ,भाऊसाहेब जाधव ,बाळासाहेब जाधव ,पप्पू साठे, सुमित बागवे, पत्रकार प्रशांत साळवे आदींनी सहभाग घेतला .आंदोलक ऐकण्याच्या मनस्थित नव्हते ते आपल्या भूमिकेवर ठाम होते, लेखी पत्र आल्याशिवाय आम्ही उठणार नाही अशी भूमिका जोगदंड व त्यांच्या सहकार्याने घेतली .त्यानंतर सायंकाळी मुख्याधिकारी प्रीतम पाटील सर यांनी त्यांना लेखी आश्वासन पत्र दिल्यानंतर येथे आंदोलन सोडण्यात आले.या आंदोलनामध्ये शिरूर शहरातील बेकायदेशीर बांधकाम तात्काळ काढण्यात यावी व अतिक्रमणे हटवण्यात यावी तसेच पूररेषेखालील अतिक्रमण व बांधकाम तात्काळ हटवणे ,स्वच्छता निरीक्षक यांचे जिल्हा शैल्य चिकित्सक ससून पुणे यांच्यामार्फत आरोग्याची तपासणी करण्यात यावी ,बांधकाम अभियंत्यांनी दिलेल्या पूर्णत्व दाखल्याची सखोल तपासणी करणे व एक वर्षांमध्ये किती पूर्णत्वाचे दाखले दिले गेले याची माहिती लेखी स्वरूपात मिळावी ,शहरातील हिंदूचे श्रध्दा स्थान कानोबा मंदिर परिसरात अतिक्रमण तात्काळ हटवण्यात यावे. बीजे कंट्रक्शनला दिलेल्या बांधकाम परवानगी तत्काळ रद्द करण्यात यावी असे अनेक प्रकारचे प्रश्न या ठिकाणी मांडण्यात आले. शिरूर शहरातील अनेक सामाजिक संघटनांनी आणि कार्यकर्त्यांनी या ठिय्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देऊन आपले स्पष्ट मत मांडले

shivshahilive
Author: shivshahilive

राशिफल
सोने चांदी
हवामान
क्रिकेट