प्रतिनिधी: प्रशांत साळवे ( मलठण, ता. शिरूर, जि. पुणे )
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अंतर्गत घेण्यात आलेल्या फेब्रुवारी २०२६ मध्ये राज्य गुणवत्ता परीक्षेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मलठण इयत्ता पाचवी मध्ये शिकत असलेली विद्यार्थिनी आराध्या दत्तात्रय शिंदे हिने २८७ गुण मिळवून राज्यात नवव्या क्रमांक वरती यश प्राप्त केले आहे .त्याचबरोबर इतर ८ विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये यश प्राप्त केले आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुणवत्तेच्या बाबतीत शिरूर तालुक्यातील खूप चांगली शाळा मानली जाते. तेथील अनुभवी शिक्षक व मुख्याध्यापक यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शक शिक्षक म्हणून मा.वाळूज सर व मा. बनकर सर यांनी विशेष त्याचबरोबर मुख्याध्यापक मिडगुले सर यांनी मार्गदर्शन केले. शाळेच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्यात नववी आल्याने आराध्याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये एकूण सात विद्यार्थी यांनी यश प्राप्त केला आहे .
( राज्य गुणवत्ता यादी )
कु. आराध्या दत्तात्रय शिंदे , २८७ गुण
( जिल्हा गुणवत्ता यादी )
कु. श्रेया अतुल थोरात २६७ गुण
कु. शिवानी ईश्वर दंडवते २५० गुण
कु. शौर्य पपोट म्हेत्रस २४८ गुण
कु. शुभ्रा किशोर नेवसे २४६ गुण
कु. आरोही दीपक दंडवते २४६ गुण
कु. जानवी कृष्णा कदम २४० गुण
कु. रिधिमा संतोष वेताळ २३६ गुण
सर्व विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे सर्व स्तरातून अभिनंदन इंग्लिश स्कूल मलठण चे नवनिर्वाचित स्कूल कमिटी सदस्य मा.श्रीमती वैशालीताई गीते पाटिल , मा . मुकुंद नाना नरवडे , मा. संदीप भाऊ गायकवाड आणि ग्रामस्थ यांनी खूप खूप कौतुक केले .



