November 5, 2026 11:26 am

Join WhatsApp Group
🟢

Join Our WhatsApp Group

Breaking News & Daily Updates Directly on WhatsApp

JOIN WHATSAPP GROUP
Join WhatsApp 🟢 JOIN WHATSAPP GROUP

आरक्षण उपवरगीकरणाच्या मागणीवर शिरूर शहरात भव्य आक्रोश मोर्चा!!

प्रतिनिधी: प्रशांत साळवे ( मलठण, ता. शिरूर, जि. पुणे )

आज शिरूर शहरामध्ये सकल मातंग समाजाच्या वतीने भव्य आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाला मार्गदर्शक म्हणून लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा. विष्णू भाऊ कसबे त्याचबरोबर, मा.अजिंक्य भैय्या चांदणे ( प्रदेश अध्यक्ष डेमोक्रॅटिक पार्टी ) मा .राजेशजी घोडे ( संस्थापक अध्यक्ष आझाद हिंद सेना ) मा.श्रीमती नगीना ताई सोमनाथ भाऊ कांबळे ( संस्थापक आधुनिक लहुजी सेना ) व मा .अमोल जी शेरकर युवा नेते हे उपस्थित होते.

महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर आरक्षण अ ब क ड उपवर्गीकरणानुसार मातंग समाजाला द्यावे या प्रमुख मागण्यांखाली हे भव्य आक्रोश मोर्चाचे नियोजन करण्यात आले होते .कर्नाटक तेलंगाना यासारख्या पाच राज्याने आरक्षण उपवर्गीकरण लागू केले असताना महाराष्ट्र राज्य सरकार का या वर निर्णय घेत नाही , अ ब क ड उपवर्गीकरणासाठी सरकार जर प्रयत्नशील असेल तर त्यांनी लवकरात विधानसभेत याविषयी कायदा मंजूर करावा व आरक्षण उपवर्गीकरण करून मातंग समाजाला द्यावे ,हे देखील या ठिकाणी नमूद करण्यात आले. या मोर्चामध्ये प्रखरपणे अजिंक्य भैय्या चांदणे यांनी आपले मनोगत व्यक्त करत मातंग समाज व बौद्ध समाजातील चालू असलेल्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या काही गोष्टी समाजासमोर मांडल्या, महापुरुष याबद्दल होत असलेले वाईट कमेंट त्यांनी समाजासमोर वाचूनच दाखवले. लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू भाऊ कसबे यांनी अबकड आरक्षण उपवर्गीकरण हे 2024 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने लागू करावे किंवा देऊ शकतो यात महाराष्ट्र राज्य सरकारने कायदा पारित करून जाहीर करावे असे सांगण्यात आले.

शिरूर शहराच्या वतीने लहुजी शक्ती सेना व इतर संघटनांनी एकत्र येऊन सर्व मोर्चातील समाज बांधवांसाठी भोजन व्यवस्था करण्यात आली होती.यामध्ये शिरूर शहर व शिरूर तालुक्यातील ,पुणे – नगर जिल्ह्यातील हजारो लहूसैनिक त्या ठिकाणी उपस्थित होते, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्केट यार्ड ते शिरूर तहसील कार्यालय या ठिकाणापर्यंत भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता तहसील कार्यालयाच्या आवारात सर्व महापुरुषांच्या फोटोला पुष्पहार घालून व मान्यवरांचे स्वागत आणि भाषण झाले . त्यानंतर सर्व समाज बांधवांना भोजनाची व्यवस्था शिरूर जुनी नगरपरिषद या ठिकाणी करण्यात आली होती. येथे पुढील काळात राज्यस्तरीय भव्य आक्रोश मोर्चाचे नियोजन करण्यात येणार असल्याचे राजेश जी घोडे यांनी सांगितले.शिरूर नगरपरिषद चे नगरसेवक चेतन भाऊ साठे , नगरसेवक उमेश शेळके,माजी नगरसेवक दादाभाऊ लोखंडे त्याचबरोबर सर्व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होतेशिरूर शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाचे आभार पुणे जिल्हा युवक अध्यक्ष लहुजी शक्ती सेना ( बंटी ) विशाल जोगदंड यांनी केले व कार्यक्रमाची सांगता झाली.

shivshahilive
Author: shivshahilive

राशिफल
सोने चांदी
हवामान
क्रिकेट