प्रतिनिधी: श्री.राजेश महांगरे ( भोर ,जि. पुणे )
राजगड (वेल्हा), दि. २२ जून — अवचित मारुती ट्रेकिंग ग्रुप आणि हिंद युवक मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राजगड तालुक्यातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम उत्साहात पार पडला.या उपक्रमांतर्गत गुहिणी, कुंबळे, खुलरी, वाघमाची, चांदवणे तसेच परिसरातील इतर गावांतील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या ७५ विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या व इतर आवश्यक शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.कार्यक्रमासाठी गुहिणी गावातील सर्व विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तसेच गावचे सरपंच, पोलीस पाटील आणि मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले.दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे आणि त्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्याची मदत व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. उपस्थित ग्रामस्थांनी या सामाजिक कार्याचे कौतुक करून आयोजकांचे आभार मानले.“शिक्षण हीच खरी ताकद असून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी असे उपक्रम सातत्याने राबविले जातील,” असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. 📚🎒✨



