November 5, 2026 1:25 pm

Join WhatsApp Group
🟢

Join Our WhatsApp Group

Breaking News & Daily Updates Directly on WhatsApp

JOIN WHATSAPP GROUP
Join WhatsApp 🟢 JOIN WHATSAPP GROUP

रायरेश्वर: हिंदवी स्वराज्य शपथभूमीवर प्लास्टिक स्वच्छता अभियान यशस्वी

प्रतिनिधी: श्री.राजेश महांगरे ( भोर ,जि. पुणे )

अरण्य षष्ठी व आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पर्यावरण जागररायरेश्वर, २० जून २०२६ – हिंदवी स्वराज्याची शपथभूमी असलेल्या श्री क्षेत्र रायरेश्वर येथे अरण्य षष्ठी आणि आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त प्लास्टिक स्वच्छता अभियान व निसर्ग परिचय उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.बायोस्फिअर्स संस्था पुणे, श्री रायरेश्वर ग्रामस्थ संस्था, मूव्हमेंट अगेंस्ट बायोलॉजिकल इनव्हेजन (माबि), पुणे वनविभाग भोर (प्रा.), सह्याद्री रेस्क्यू फोर्स, स्थानिक ग्रामस्थ व संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.या प्रसंगी डॉ. सचिन अनिल पुणेकर, श्री. सचिन देशमुख, श्री. राजेश महांगरे, श्री. संदीप जंगम, श्री. रोहन इंगवले, श्री. शुभम बाबर, आर्किटेक्ट शुभम दिघे, डॉ. संतोष खेडकर,सौ.रुपाली राजेश महांगरे वहिनी, श्री. कोळी सर,श्री. नारायण जंगम, श्री. पांडुरंग जंगम, श्री. काशिनाथ जंगम, पर्यावरण प्रेमी व शाळेय विद्यार्थी यांचा विशेष सक्रिय सहभाग नोंदवून मंदिर परिसर, पायवाटा व पर्यटन मार्गांवरील प्लास्टिक कचरा मोठ्या प्रमाणात गोळा करून परिसर स्वच्छ केला. संकलित कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली.प्लास्टिक प्रदूषणामुळे रायरेश्वरसारख्या संवेदनशील अधिवास व शेंद्री-मुर्हा पठारावरील जीवसृष्टीला होणाऱ्या धोक्यांबाबत जनजागृती करणे, पर्यटकांना “प्लास्टिकमुक्त रायरेश्वर” चे महत्त्व पटवून देणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश होता. निसर्गस्नेही सण साजरे करून जबाबदार पर्यटन करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.निसर्ग, इतिहास व पर्यावरणाचे जतन करण्यासाठी अशा उपक्रमांची सातत्याने गरज असल्याचे मत आयोजकांनी व्यक्त केले.

वर नमूद बाबी लक्षात घेता पर्यावरणीय व सांस्कृतिक विषयांबाबत सजग असलेल्या आपल्या वृत्तमाध्यमातून हे अनोखे अभियान सर्वदूर व्हावे या प्रामाणिक आणि नम्र विनंती सह…धन्यवाद आपले विश्वासू,समस्त निसर्ग संवर्धक व उपासक संपर्क: ९५०३०९६४६९ (डॉ. सचिन अनिल पुणेकर); ९२७२७१८००८ (श्री. सचिन देशमुख); ९९२३९७७९७९ (श्री. राजेश महांगरे);७२१८४९०३९१ (श्री. संदीप जंगम); ८३०८६८५७९३ (श्री. शुभम दिघे); ९८९०१५५२४८ (डॉ. संतोष खेडकर).

shivshahilive
Author: shivshahilive

राशिफल
सोने चांदी
हवामान
क्रिकेट