प्रतिनिधी: श्री.राजेश महांगरे ( भोर ,जि. पुणे )
भोर : भोर/राजगड कं. प्रॉ. डिस्ट्रीब्युटर्स असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेला स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात संपन्न झाला. सोनाली गार्डन, भोर येथे आयोजित या कार्यक्रमास असोसिएशनचे सभासद, पदाधिकारी तसेच पुणे जिल्हा कं. प्रॉ. डिस्ट्रीब्युटर्स असोसिएशन (R) चे मान्यवर प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात संघटनेची वाटचाल, व्यापारी क्षेत्रातील विविध समस्या, भविष्यातील उपक्रम तसेच सभासदांमधील समन्वय आणि एकजूट याबाबत चर्चा करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन करताना संघटितपणे कार्य करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने सर्व सभासदांना एकत्र येण्याची, परस्पर संवाद साधण्याची आणि व्यावसायिक संबंध अधिक दृढ करण्याची संधी मिळाली.

कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन उत्कृष्टरीत्या पार पडल्याबद्दल उपस्थितांनी आयोजकांचे कौतुक केले.कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी “संघटित व्हा, संघटित राहा आणि प्रगती साधा” हा संदेश देत असोसिएशनच्या भावी उपक्रमांना पूर्ण सहकार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.



