November 5, 2026 11:25 am

Join WhatsApp Group
🟢

Join Our WhatsApp Group

Breaking News & Daily Updates Directly on WhatsApp

JOIN WHATSAPP GROUP
Join WhatsApp 🟢 JOIN WHATSAPP GROUP

सार्वजनिक बांधकाम विभाग व कंत्राटदार यांच्या ढिसाळ कारभारामुळे एक तरुण झुंजतोय मृत्यूशी!

प्रतिनिधी: प्रशांत साळवे ( मलठण, ता. शिरूर, जि. पुणे )

शिरूर ( टाकळी हाजी ) दि:१५ जून २०२६
निमगाव दुडे ते मलठण रस्त्यावरील उघड्या खड्ड्यात कोसळून श्री.अनुराज निकम वय २७ हा तरुण कोळपे हॉस्पिटलच्या ICU मध्ये मृत्यूशी झुंज देत आहे. दुसरीकडे जबाबदार कंत्राटदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी मात्र या प्रकरणातून आपली कातडी वाचवण्यासाठी निव्वळ चालढकल करत असल्याचे समोर आले आहे. या जीवघेण्या निष्काळजीपणाबद्दल दोषी कंत्राटदार आणि संबंधित अधिकार्‍यांवर तात्काळ फौजदारी गुन्हा (FIR) दाखल करण्यात यावा, व पीडित तरुणाच्या उपचाराचा खर्च संबंधितांनी द्यावा,अशी मागणी पीडित निकम कुटुंब आणि समस्त ग्रामस्थांकडून केली जात आहे.

🚧 रस्ता रुंदीकरणाच्या कामात रात्रीच्या वेळी चमकणारे कोणतेही रिफ्लेक्टर किंवा सुरक्षेचे बॅरिकेड्स न लावल्यामुळे हा भीषण अपघात घडला. असे असूनही, अपघात घडून तीन दिवस उलटले तरी PWD च्या एकाही अधिकार्‍याने घटनास्थळाची साधी पाहणी करण्याचे सौजन्य दाखवलेले नाही. कंत्राटदार स्वतः घटनास्थळावरून गायब असून, पीडित कुटुंबाने आणि ग्रामस्थांनी त्याला फोन करून नातवाच्या उपचारासाठी मदतीची याचना केली असता, तो फोनवर अत्यंत उद्धट आणि उडवाउडवीची उत्तरे देऊन जबाबदारी झटकत आहे.
दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी “हा कंत्राटदाराचा वैयक्तिक विषय आहे” असे सांगून हात वर करत आहेत.

अनाथ नातवाच्या उपचारासाठी पैसे नसलेले वृद्ध आजी-आजोबा हताश झाले आहेत. कंत्राटदार आणि अधिकार्‍यांच्या या अमानुष भूमिकेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून, “दोषींवर तात्काळ गुन्हा नोंदवून कडक कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे,” अशी आग्रही मागणी आता ग्रामस्थांनी लावून धरली आहे. जर प्रशासनाने तात्काळ पावले उचलली नाहीत, तर ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवबा संघटना टाकळी हाजी यांनी देण्यात आला आहे.

दोषींवर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करून नुकसान भरपाई देण्याची निकम कुटुंब व संतप्त ग्रामस्थांची आक्रमक मागणी!

shivshahilive
Author: shivshahilive

राशिफल
सोने चांदी
हवामान
क्रिकेट