November 5, 2026 1:27 pm

Join WhatsApp Group
🟢

Join Our WhatsApp Group

Breaking News & Daily Updates Directly on WhatsApp

JOIN WHATSAPP GROUP
Join WhatsApp 🟢 JOIN WHATSAPP GROUP

आमदार शंकरभाऊ माडेकर यांनी केले कापूरहोळ ते भोर-मांढरदेवी रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी

प्रतिनिधी: श्री.राजेश महांगरे ( भोर ,जि. पुणे )

कापूरहोळ ते भोर-मांढरदेवी रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केली. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची आणि भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे.

सद्यस्थितीत या रस्त्याची दुरवस्था झाली असून प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे, पावसाळा सुरू होण्यापूर्वीच या रस्त्याच्या दुरुस्तीची कामे तातडीने आणि दर्जेदार पद्धतीने मार्गी लावण्याच्या सक्त सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

या पाहणी दौऱ्याप्रसंगी पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे, भोर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष रामचंद्र नाना आवारे, भोर पंचायत समितीच्या सभापती मनिषाताई संतोष कंक, उपसभापती विशाल कोंडे, पंचायत समिती सदस्य राजेश बोडके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता राजेसाहेब आगळे उपस्थित होते. तसेच खानापूर, भोलावडे, आणि संगमनेर गावातील स्थानिक नागरिकांसह इतर आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते

shivshahilive
Author: shivshahilive

राशिफल
सोने चांदी
हवामान
क्रिकेट