November 5, 2026 1:26 pm

Join WhatsApp Group
🟢

Join Our WhatsApp Group

Breaking News & Daily Updates Directly on WhatsApp

JOIN WHATSAPP GROUP
Join WhatsApp 🟢 JOIN WHATSAPP GROUP

मलठण पावर हाऊस वरती घेतला शेतकऱ्यांनी ताबा

प्रतिनिधी: श्री प्रशांत साळवे ( ता. शिरूर, जि. पुणे )

मलटण येथील पावर हाऊस वरती मलटण गावातील शेतकऱ्यांनी तीन तास ताबा घेऊन त्या ठिकाणी आक्रमक झालेले पाहायला मिळाले. शिरूर तालुक्यात सुरू असलेल्या लोड शेडिंग मुळे आधीच त्रासलेले शेतकरी आणि नागरिकांनी रात्री दहा ते एक वाजेपर्यंत विद्युत महामंडळाच्या बोर्ड वरती ताबा घेतला होता, मलटण परिसरात आधीच सायंकाळी सहा ते दहा या वेळेत लोड शेडिंग सुरू असते परंतु गावठाण फिडर चालू असताना फक्त शास्त्राबाद फिडरलाच लोड शेडिंग देण्यात आले होते.आज दहा वाजता लाईट आली आणि दहा वाजून पंधरा मिनिटांनी पुन्हा लोड सेटिंग चा मेसेज पडल्यामुळे लाईट बंद करण्यात आली होती,परंतु मलठण गावातील नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी फक्त शास्त्राबाद फिटरलाच पुन्हा लोड शिडींग दिले असल्याने गावठाण फिटर ही बंद करण्यात आला होता.त्याचबरोबर वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर असे निदर्शनात आले की त्या ठिकाणी विद्युत महामंडळाकडून लोड सेटिंग पुन्हा वाढवण्यात आले आहे.

परंतु सायंकाळी सहा ते दहा लोड शेडिंग दिले असतानाही 10 च्या नंतर पुन्हा लोड शेडिंग देण्यात आले मलटण हा परिसर बिबट प्रमाण क्षेत्रात येतो त्या ठिकाणी विद्युत महामंडळाला येथून पाठीमागच्या वेळेस ही ग्रामपंचायत किंवा अनेक संघटनांनी निवेदने देऊन लोड शेडिंग टायमिंग चेंज करण्याची विनंती करण्यात आली होती,परंतु आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी शास्त्राबाद फिटर सहित गावठाण फिडर बंद करण्यात आला. तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर ग्रामस्थांनी त्या ठिकाणी लोड शेडिंग चा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यात यावा यासाठी चर्चा करण्यात आली.या भागात अनेक वेळा बिबट हल्ले,चोऱ्यांचे प्रमाण त्याचबरोबर डीपी फोडण्याचे प्रमाण खूप वाढलेले असताना देखील रात्री अचानक वाढलेले लोड शेडिंग त्यामुळे नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागतो या अचानक झालेल्या लोड शेडिंग मुळे नागरिक थेट पावर हाऊस वरती जाऊन संबंधित अधिकाऱ्यांशी फोनवरती चर्चा करून लवकरात लवकर मार्ग काढण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले, महाराष्ट्र विद्युत मंडळाचे माने साहेब यांनी सकारात्मक चर्चा केली. यावेळी मलटण गावची बागायतदार संपतराव गायकवाड,उद्योजक राहुल कदम, विशाल दंडवते,बिरा शिंदे, दत्ता फुलसुंदर, हरपित बोडरे,पिंटू शेठ कोळपे, दीपक दंडवते आणि तरुण उपस्थित होते. यावेळी विद्युत महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर लोड शेडिंग चा मार्ग मोकळा नाही केला, तर हजारो शेतकऱ्यांना बरोबर घेऊन आंदोलन करण्याचा इशारा बागायतदार संपतराव गायकवाड उद्योजक राहुल कदम आणि विशाल दंडवते यांनी देण्यात आला.

shivshahilive
Author: shivshahilive

राशिफल
सोने चांदी
हवामान
क्रिकेट