प्रतिनिधी: प्रशांत साळवे ( मलठण, ता. शिरूर, जि. पुणे )
शिरूर तालुक्यातील मलठण येथील सुरू असलेल्या खाण प्रकल्पामध्ये बेकायदेशीर ग्रामस्थांनी जगणे मुश्किल झाले आहे, वारंवार ग्रामपंचायत व तहसील दार यांनी स्पष्ट इशारा देउन पण खाण मालक मुजोरपने वागत आहे, खाणीमध्ये चालू असलेली ब्लास्टिंग थांबलेले नाही .
काल दिनांक 15/04/2026 रोजी दुपारी पाच वाजून दहा मिनिटांनी खूप मोठे ब्लास्टिंग झाले ,त्यावेळी संपूर्ण गावाला खूप मोठा हादरा बसला होता. आधीपासूनच भिंतींना तडे जाणे आणि अचानक गेलेले बोरवेल चे पाणी ,यामुळे ग्रामस्थ हैराण झालेले आहेत.

या ब्लास्टिंग मुळे गावामध्ये धुळीचे साम्राज्य पसरलेले पाहायला मिळते, त्याचबरोबर नागरिकांना श्वसनाचे आजार ,लहान मुलांना बाल दमा आणि फुफुसाचे आजार जाणवू लागले आहेत. तसेच ब्लास्टिंग मुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे . श्री गणेश जामदार (उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हा समन्वयक ) यांनी यापूर्वी आंदोलनाचा इशारा दिला होता परंतु मुजोर खाण मालक कुठल्याही प्रकारची दाद देण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीत,
त्यामुळे येत्या काही दिवसात उपोषणाला बसणार असल्याचे श्री गणेश जामदार यांनी सांगितले आहे. यावर प्रशासनाणे लवकरात लवकर कारवाही करावी.






