April 17, 2026 3:24 pm

Join WhatsApp Group
🟢

Join Our WhatsApp Group

Breaking News & Daily Updates Directly on WhatsApp

JOIN WHATSAPP GROUP
Join WhatsApp 🟢 JOIN WHATSAPP GROUP

लाडक्या मंगल ताईंचा सेवापुर्ती समारंभ मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा

प्रतिनिधी : श्री.प्रशांत साळवे (मलठण, ता.शिरूर,जि.पुणे)

मलठण गावचे सासर आणि कान्हुर मेसाई येथील कन्या
आदर्श शिक्षक सौ.मंगल ताई अनिलराव शिंदे यांचा सेवापूर्तीच्या कार्यक्रम आज दिनांक 13/04/2026 रोजी निमगाव भोगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी संपन्न करण्यात आला.


शिंदे परिवारातील एक आदर्श व्यक्तिमत्व सौ.मंगल ताई यांनी 1988 ते 2026 पर्यंत 38 वर्षे शिक्षक म्हणून उत्कृष्ट पद्धतीने काम केले शिक्षक म्हणून काम पाहत असताना त्यांनी गोरगरीब मुलांना अनेक वेळा मदत केली.

त्यांच्याबरोबर त्यांचे पती आणि कान्हुर मेसाईचे आदर्श प्राचार्य प्राध्यापक श्री.अनिलराव शिंदे सर यांनी देखील गोरगरीब मुलांना शिक्षणासाठी मदत केलेली आहे.

तसेच या कार्यक्रमासाठी शिंदे परिवाराचे जावई श्री.कुलदीप राजे (सह-आयुक्त जीएसटी भारत सरकार) व सौ.प्रियंका कुलदीप राजे (सी.ओ), सौ.निर्मलाताई पानसरे(माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पुणे), निमगाव भोगी शाळा मुख्याध्यापक श्री.सुरेश राव थोरात, निमगाव भोगी सरपंच सौ.ज्योतीताई सांबारे, पुणे जिल्हा शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष श्री.युवराज थोरात व श्री.सचिन शिंदे, श्री. शिंदे सी टी सर.

मलठण गावचे व निमगाव भोगी गावचे ग्रामस्थ शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.रोहिदास जाधव यांनी केले तर आभार सौ
.प्रियंका शिंदे /राजे यांनी मानले कार्यक्रमाचे सांगता विद्यार्थ्यांना स्नेहभोजन देऊन करण्यात आले.

shivshahilive
Author: shivshahilive

राशिफल
सोने चांदी
हवामान
क्रिकेट