शिरूर प्रतिनिधी:प्रशांत साळवे
शिरूर तालुक्यातील सोने सांगवी आणि मलटण हद्दीमध्ये आज दिनांक 16 रोजी पुणे पिंपरी चिंचवड पोलीस आणि आरोपी यामध्ये चकमक झाली पुणे पोलिसांच्या माहितीनुसार पुणे पिंपरी चिंचवड येथील एका पुण्यातील 2 आरोपी सोने सांगवी हद्दीमध्ये लपून बसल्याची माहिती गोपनीय सूत्रांकडून पुणे पोलिसांना भेटली होती. त्या आरोपींच्या शोधासाठी पुणे ग्रामीण पोलीस व पिंपरी चिंचवड पोलीस यांनी शिक्रापूर मलठण रोड व वाघाळे हद्दीच्या जवळ नाकाबंदी केलेली आहे सदर आरोपी चा पाठलाग करत असताना आरोपींनी पोलिसांवरती फायरिंग सुरू केले संरक्षणासाठी सुरुवातीला पोलिसांनी हवेत फायरिंग केले.
आरोपींनी ज्यावेळेस ठिकाणाहून पळ काढला शेजारी असलेल्या उसाच्या शेता चा फायदा घेत पसार झाले आहे त्यामुळे सोने सांगवी वाघाळे आणि मलठण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पुढील कारवाईसाठी शिरूर पोलीस स्टेशन व रांजणगाव पोलीस स्टेशन पोलीस कर्मचाऱ्यांनी मोठा पोस्ट फाटा त्या ठिकाणी दाखल झाला होता आणि सदरील उसाच्या शेताला पोलिसांनी घेराव घातला असून कारवाई चालू आहे



