प्रतिनिधी: श्री.सचिन शिंदे ( ता.शिरूर,पुणे )
शिंदोडी गावातील वीज समस्यांबाबत २१ मे रोजी आमरण उपोषणाचा इशारा
शिरूर तालुक्यातील शिंदोडी गावामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार होणारे लोडशेडिंग, सिंगल फेज वीजपुरवठ्याच्या समस्या आणि अपुऱ्या वीज व्यवस्थेमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या गंभीर समस्यांकडे महावितरण प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधूनही कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने अखेर शिंदोडी ग्रामस्थांच्या वतीने आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शेतकरीसेना तालुकाप्रमुख शिरूर तथा सामाजिक कार्यकर्ते योगेश पाटील यांनी याबाबत महावितरण कार्यालय, शिरूर येथे निवेदन सादर केले आहे,त्याप्रसंगी उपतालूकाप्रमुख अनिल पवार,तालुका सल्लागार संतोष काळे,ॲड.संदीप शिंदे,प्रशांत साळवे,

गावातील अनेक वाडी-वस्त्यांवर अद्यापही सिंगल फेज वीजपुरवठा उपलब्ध नसल्यामुळे बिबट्याची हल्ला करण्याची भिती व शेतकऱ्यांना पिकांना पाणी देताना रात्रीच्या वेळी अडचणी येत आहेत. विद्यार्थ्यांच्या अभ्यासात व्यत्यय येत असून रात्रीच्या अंधारामुळे नागरिकांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.
या सर्व समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्यात यावी, या मागणीसाठी गुरुवार, दिनांक २१ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, शिंदोडी येथे आमरण उपोषण सुरू करण्यात येणार आहे.
तसेच शिरूर तालुक्यातील बेट भागातील गावांमध्ये होणाऱ्या लोडशेडिंगमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांबाबत निवेदन महावितरण कार्यालय शिरुर यांना शिवसेनेच्या शेतकरीसेनेच्या वतिने आंदोलनाचा ईशारा..
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शेतकरी सेनेच्या वतीने शिरूर तालुक्यातील बेट भागातील गावांमध्ये सुरू असलेल्या लोडशेडिंगच्या समस्येबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
शिरूर तालुक्यातील बेट भागातील अनेक गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.मलठण परिसरात विशेषतः लोडशेडिंगमुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे.



