प्रतिनिधी: श्री प्रशांत साळवे ( ता. शिरूर, जि. पुणे )
शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी पोलिस चौकी गंभीर आरोपांचा भडका उडाला असून ही चौकी वसुलीचा अडा बनलेची चर्चा एका व्हायरल व्हिडिओ मुळे समोर आली आहे, परस्पर विरोधी तक्रारी घेणे पैशाच्या जोरावर तडजोडी घडवून आणणे अवैध धंद्यावर कारवाई न करणे अशा अनेक प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. नुकत्याच उघडकीस आलेल्या एका धक्कादायक प्रकारामुळे आरोपांना धार येत आहे, टाकळी हाजी येथील एक तरुणी बेपत्ता झाल्यानंतर काही दिवसांनी ती पारनेर पोलीस ठाण्यात हजर झाली व तिने लग्न केल्याचे स्पष्ट झाले होते.

मात्र जबाब नोंदवण्यासाठी गेलेल्या दोन पोलिसांनी तपासा सोबत मुलाच्या नातेवाईकांकडून पैशाची मागणी केली आहे आणि त्या सर्व प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने संतापाची लाट निर्माण झाली आहे. कायद्याचे रक्षकच भक्षक बनल्या असे सवाल नागरिक करत आहेत यापूर्वी बेड भागात शेतकऱ्यांच्या कृषी साहित्याचे केबल चोरी जाणे, डिपी चोरी जाणे, पशुधन चोरीला जाणे यासारखे अनेक प्रकार घडलेला आहे तरी या सर्व परिसरात आता वरिष्ठ पोलीस अधिकारी कारवाई करणार का ? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे

.शिरूर तालुक्यातील अवैध धंदे ,अवैध उत्खनन , चोरी, ड्रग्स यासारख्या अनेक समस्या आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला असून पोलीस अधीक्षक मा.संदीप सिंग गिल यांनी शिरूर पोलीस स्टेशनला भेट दिली होती व एक दबंग पोलीस अधिकारी या तालुक्याला देतील अशी अपेक्षा सर्वसामान्यांना होती .
परंतु रक्षकच भक्षक झाल्याची घटना आज टाकळी पोलीस चौकी या ठिकाणी घडल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार एखाद्या पीडितेने तक्रार दाखल केली तर समोरील व्यक्ती पोलिसांशी संगनमत करून परस्पर विरोधी तक्रारी दाखल करतात परिणामी न्याय मागणाऱ्यांना धक्के बसत असून सामान्य नागरिक असुरक्षितेच्या छायेत जगत आहेत



