प्रतिनिधी: प्रशांत साळवे ( मलठण, ता. शिरूर, जि. पुणे )
“” मलठण च्या सौ.पूजा महेश गोसावी यांचा संघर्ष यशस्वी “
कारागृह पोलीस असताना , पुणे शहर पोलीस दलात नियुक्ती
शिरूर तालुक्यातील मलठण येथील अत्यंत गरीब कुटुंबातील सौ.पूजा महेश गोसावी यांनी जिद्द चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावरती
मोठे यश प्राप्त करून पुणे शहर पोलीस दलात नियुक्ती मिळवली आहे . तिच्या यशामुळे मलठण आणि परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सौ.पूजा महेश गोसावी यांना अनेक अडचणींना सामोरे जात असताना शिक्षण आणि करिअरच्या वाटचालीत खंबीरपणे उभे राहिले त्यांचे सासरे श्री विलास गोसावी( पोलीस मित्र संघटना शिरूर ) यांनी रुढी आणि परंपरांना न मानता शिरूर सारख्या ठिकाणी त्यांना शितोळे करियर अकॅडमी जॉईन करून दिले, तिला मार्गदर्शक शिक्षक म्हणून श्री शितोळे सर यांनी शारीरिक आणि लेखी परीक्षेची काटेकोर तयारी करून घेतली,
परीक्षकांच्या योग्य मार्गदर्शनामुळे व तिच्या अथक परिश्रमामुळे तिने सर्व टप्पे यशस्वीरित्या पार केले.आणि हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवत अभ्यास आणि खूप कष्ट घेतले.

तिच्या यशामुळे परिसरातील अनेक मुलींना पेरणा मिळत आहे, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ती आदर्श ठरत आहेत सुरुवातीला कारागृह पोलीस त्यानंतर पुणे शहर पोलीस दलत नियुक्ती म्हणजे मलठण गावाला अभिमान वाटत असल्याचे पती श्री महेश गोसावी यांनी सांगितले.
” गरीबी ही अडथळा नसून जिद्दीने कोणत्याही स्वप्न साकार करता येते पूजा हिने आपल्या यशातून दाखवून दिले “



