April 17, 2026 4:36 pm

Join WhatsApp Group
🟢

Join Our WhatsApp Group

Breaking News & Daily Updates Directly on WhatsApp

JOIN WHATSAPP GROUP
Join WhatsApp 🟢 JOIN WHATSAPP GROUP

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ वी जयंती मलठण मध्ये उत्साहात साजरी

प्रतिनिधी : श्री.प्रशांत साळवे (मलठण, ता.शिरूर,जि.पुणे)

” मान वंदना महामानवाला “
मलठण ता.शिरूर येथील राजगुरू वस्ती मध्ये महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून जयंती साजरी करण्यात आली . कार्यक्रमाचे आयोजन संपूर्ण राजगुरू परिवाराने केले होते.
तसेच लहान मुलांनी सुंदर अशी रांगोळी काढली त्याचबरोबर कु.आर्या राजगुरू, कु.गायत्री राजगुरू यांनी सुंदर अशी भाषण केले.
या कार्यक्रमासाठी मलटण गावचे माजी उपसरपंच सौ.वंदनाताई राजगुरू, माजी उपसरपंच श्री.संतोष भैय्या कोठावळे तसेच श्री सचिन शिंदे, श्री विशाल साळवे, श्री भरत राजगुरू, श्री अमोल राजगुरू, श्री रोहित राजगुरू, श्री महेश गोसावी व लहुजी शक्ती सेना तालुका उपाध्यक्ष श्री प्रशांत साळवे आदीमान्यवर उपस्थित होते तसेच मोठ्या संख्येने लहान मुले व महिला भगिनी ही उपस्थित होते.
त्याचबरोबर अनेक ग्रामस्थांनी त्या ठिकाणी असलेल्या सभा मंडप ऐवजी बुद्ध विहार बांधून देण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य मा श्री राजेंद्र दादा गावडे यांच्याकडे करण्यात आली.
मान्यवरांचे स्वागत श्री रोहित राजगुरू यांनी केले व आभार श्री अमोल राजगुरू यांनी मानले उपस्थित कार्यक्रमाची सांगता मानवंदना व लहान मुलांना खाऊ वाटपाने करण्यात आली.

shivshahilive
Author: shivshahilive

राशिफल
सोने चांदी
हवामान
क्रिकेट