November 24, 2026 1:07 am

Join WhatsApp Group
🟢

Join Our WhatsApp Group

Breaking News & Daily Updates Directly on WhatsApp

JOIN WHATSAPP GROUP
Join WhatsApp 🟢 JOIN WHATSAPP GROUP

शिंदोडी गावात बिबट्याची दहशत; ३० नोव्हेंबरपर्यंत पिंजरे लावा, अन्यथा वनविभागाविरोधात आंदोलन!

प्रतिनिधी: प्रशांत साळवे ( मलठण, ता. शिरूर, जि. पुणे )

योगेश ओव्हाळ-पाटील यांचा वनविभागाच्या अधिकाऱ्यांना इशारा . शिंदोडी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, शेतमजूर तसेच शाळकरी विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून दैनंदिन कामकाज करावे लागत आहे. शेतात काम करण्यासाठी जाणारे शेतकरी व मजूर, सकाळी आणि संध्याकाळी शाळेत ये-जा करणारे विद्यार्थी यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

बिबट्याच्या वाढत्या दहशतीमुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून वनविभागाने या परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. केवळ आश्वासने न देता बिबट्याला पकडण्यासाठी संवेदनशील ठिकाणी तातडीने पिंजरे लावावेत, अशी मागणी शिवसेना शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख योगेश ओव्हाळ-पाटील यांनी केली आहे.

येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत शिंदोडी गाव व परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. अन्यथा वनविभागाच्या निष्क्रिय कारभाराविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही योगेश ओव्हाळ-पाटील यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.

नागरिकांच्या जीविताशी कोणताही खेळ चालणार नाही. एखादी दुर्घटना घडल्यानंतर जागे होण्यापेक्षा प्रशासनाने वेळीच खबरदारी घ्यावी. सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आता वनविभागाने तातडीने कार्यवाही करावी, हीच आमची ठाम भूमिका आहे.

PRASHANT SALVE
Author: PRASHANT SALVE

राशिफल
सोने चांदी
हवामान
क्रिकेट