November 5, 2026 1:29 pm

Join WhatsApp Group
🟢

Join Our WhatsApp Group

Breaking News & Daily Updates Directly on WhatsApp

JOIN WHATSAPP GROUP
Join WhatsApp 🟢 JOIN WHATSAPP GROUP

आमदार माऊलीआबा कटके, प्रसिद्ध उद्योगपती प्रकाशशेठ धाडीवाल व नगराध्यक्षा ऐश्वर्याताई पाचर्णे यांच्या सहकार्याने महिला व बालकल्याण विभागाला स्वतंत्र नामफलक; सभापती आयेशा कलीम सय्यद यांच्या पाठपुराव्याला यश

प्रतिनिधी: प्रशांत साळवे ( मलठण, ता. शिरूर, जि. पुणे )

शिरूर नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाला स्वतंत्र ओळख मिळावी तसेच महिला व बालकांना शासकीय योजनांची माहिती आणि विविध सेवांचा लाभ अधिक सुलभपणे उपलब्ध व्हावा, या उद्देशाने महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. आयेशा कलीम सय्यद यांनी विभागासाठी स्वतंत्र नामफलक उभारण्याची मागणी लेखी निवेदनाद्वारे केली होती. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून महिला व बालकल्याण विभागासाठी स्वतंत्र नामफलक उभारण्यात आला आहे.

या उपक्रमाला माननीय आमदार माऊलीआबा कटके यांचे मार्गदर्शन, प्रसिद्ध उद्योगपती माननीय प्रकाशशेठ धाडीवाल यांचे सहकार्य आणि नगराध्यक्षा सौ. ऐश्वर्याताई पाचर्णे यांचा सकारात्मक पुढाकार लाभला. लोकहिताचा विचार करून नगराध्यक्षा पाचर्णे यांनी संबंधित प्रस्तावाला तातडीने मान्यता देत आवश्यक प्रशासकीय कार्यवाहीस गती दिली. मुख्याधिकाऱ्यांच्या सहकार्यामुळे नामफलक उभारण्याची प्रक्रिया अल्पावधीत पूर्ण झाली.

महिला व बालकल्याण विभागाला स्वतंत्र ओळख मिळावी, या भूमिकेला नगरपरिषदेतील सर्व नगरसेवक तसेच विविध समित्यांच्या सभापतींनी एकमताने पाठिंबा दिला. सर्वांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वीरीत्या पूर्णत्वास गेला.महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. आयेशा कलीम सय्यद या महिला व बालकांच्या प्रश्नांबाबत सातत्याने पाठपुरावा करत असून शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा, त्यांच्या अडचणी प्रशासनापर्यंत पोहोचाव्यात आणि जनहिताची कामे वेळेत मार्गी लागावीत यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत.या उपक्रमात महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापती सौ. स्वप्नालीताई जामदार तसेच सदस्य सौ. चारुशीला कोळपकर, सौ. स्वीटी शिंदे आणि सौ. पूजा कोठावळे यांनीही सक्रिय सहकार्य केले.यावेळी सभापती सौ. आयेशा कलीम सय्यद यांनी माननीय आमदार माऊलीआबा कटके, प्रसिद्ध उद्योगपती माननीय प्रकाशशेठ धाडीवाल, नगराध्यक्षा सौ. ऐश्वर्याताई पाचर्णे, मुख्याधिकारी, सर्व नगरसेवक, सर्व समिती सभापती तसेच महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापती व सदस्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

महिला व बालकांच्या हितासाठी भविष्यातही अशाच लोककल्याणकारी उपक्रमांचा सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.महिला व बालकांच्या हितासाठी सातत्याने केलेला पाठपुरावा, प्रशासनाशी राखलेला प्रभावी समन्वय आणि लोकहिताच्या विषयांवर दाखविलेली तत्परता यामुळे सभापती सौ. आयेशा कलीम सय्यद यांच्या कार्याचे नागरिकांमधून कौतुक होत असून, महिला व बालकल्याण क्षेत्रातील हा उपक्रम शिरूर नगरपरिषदेच्या कार्यात एक सकारात्मक आणि लोकाभिमुख पाऊल म्हणून पाहिला जात आहे.

shivshahilive
Author: shivshahilive

राशिफल
सोने चांदी
हवामान
क्रिकेट