November 5, 2026 1:29 pm

Join WhatsApp Group
🟢

Join Our WhatsApp Group

Breaking News & Daily Updates Directly on WhatsApp

JOIN WHATSAPP GROUP
Join WhatsApp 🟢 JOIN WHATSAPP GROUP

भोर–महाड मार्गावरील वरंधा घाटात दरडी कोसळण्याचे सत्र सुरूच; २७ वाहनांतील ७० ते ८० प्रवासी रात्रभर अडकले

प्रतिनिधी: श्री.राजेश महांगरे ( भोर ,जि. पुणे )

भोर–महाड मार्गावरील वरंधा घाटात मुसळधार पावसामुळे दरडी कोसळण्याचे सत्र काही केल्या थांबत नाही. शुक्रवारी आणि रविवारी झालेल्या दरडी कोसळण्याच्या घटनांनंतर रविवारी (ता. ५) रात्री पुन्हा भोर हद्दीतील वारवंड ते उंबर्डे दरम्यान चार ते पाच ठिकाणी मोठ्या दरडी कोसळल्या. सुदैवाने या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.दरडी कोसळल्यामुळे पुणे जिल्ह्यातून महाडकडे जाणारा मार्ग पूर्णपणे विस्कळीत झाला असून दोन्ही बाजूंनी वाहतूक ठप्प झाली आहे.

महाडच्या दिशेने जाणाऱ्या आणि भोरच्या दिशेने येणाऱ्या वाहनांसह एकूण २७ वाहनांमधील सुमारे ७० ते ८० प्रवासी रविवारी रात्रीपासून घाटात अडकून पडले आहेत.प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि कंत्राटदारांकडून रात्रीपासूनच युद्धपातळीवर दरडी हटवण्याचे काम सुरू आहे. मात्र, सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि नव्याने दरडी कोसळत असल्याने बचाव व मार्ग मोकळा करण्याच्या कामात अडथळे निर्माण होत आहेत.

प्रशासनाने आतापर्यंत सुमारे १० लहान-मोठ्या दरडी हटवल्या असून, भोरहून महाडच्या दिशेने वारूण परिसरात अद्याप १० ते १२ वाहने अडकून आहेत. तर महाडकडून भोरच्या दिशेने येणारी २७ वाहने शिरगावजवळील वाघजाई मंदिर परिसरात दोन्ही बाजूंनी दरड कोसळल्यामुळे सुरक्षित ठिकाणी थांबवण्यात आली आहेत.अडकलेल्या प्रवाशांसाठी प्रशासनाकडून अन्न व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून, पाऊस ओसरताच मार्ग पूर्णपणे खुला करण्यासाठी यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत आहे. प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय वरंधा घाटातून प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.

shivshahilive
Author: shivshahilive

राशिफल
सोने चांदी
हवामान
क्रिकेट