प्रतिनिधी: श्री.राजेश महांगरे ( भोर ,जि. पुणे )
भोर, प्रतिनिधी : पुणे येथील वाघोली येथे आयोजित चौथी जी. एच. रायसोनिक मेमोरियल पुणे आंतरराष्ट्रीय फिडे जलद रेटिंग बुद्धिबळ स्पर्धा २०२६ मोठ्या उत्साहात पार पडली. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत भोर तालुक्यातील बुद्धिबळपटू तेजश्री सपकाळ हिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत १५ वर्षांखालील मुलींच्या गटात द्वितीय क्रमांक पटकावून भोरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
तेजश्रीच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे भोर तालुक्यात आनंदाचे वातावरण असून विविध स्तरांतून तिचे अभिनंदन होत आहे.स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभास रायसोनिक इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य तसेच महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे उपसचिव राजेंद्र कोंडे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते तेजश्रीला सन्मानचिन्ह व पारितोषिक प्रदान करण्यात आले.
तेजश्रीच्या या यशाबद्दल तिच्या पालक, प्रशिक्षक तसेच क्रीडाप्रेमींनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत भविष्यातही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अशीच उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.



