November 5, 2026 2:03 pm

Join WhatsApp Group
🟢

Join Our WhatsApp Group

Breaking News & Daily Updates Directly on WhatsApp

JOIN WHATSAPP GROUP
Join WhatsApp 🟢 JOIN WHATSAPP GROUP

घोरपडेवाडीत रोटरी क्लबच्या माध्यमातून आरओ वॉटर फिल्टरचे लोकार्पण

प्रतिनिधी: श्री.राजेश महांगरे ( भोर ,जि. पुणे )

घोरपडेवाडी (प्रतिनिधी): घोरपडेवाडी येथे क्षारयुक्त पाण्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन रोटरी क्लबच्या माध्यमातून आरओ (RO) वॉटर फिल्टर बसविण्यात आला. या प्रकल्पाच्या लोकार्पणाचा कार्यक्रम शनिवार, २७ जून २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

घोरपडेवाडीतील पिण्याच्या पाण्यातील वाढलेल्या क्षारांमुळे ग्रामस्थांना विविध आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागत होते. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून ग्रामस्थ मंडळ घोरपडेवाडी व ग्रामपंचायत आंबवडे यांच्या वतीने रोटरी क्लब भोरकडे आरओ वॉटर फिल्टरची मागणी करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत रोटरी क्लब भोर व रोटरी क्लब निगडी यांच्या संयुक्त विद्यमाने गावात आरओ वॉटर फिल्टर बसविण्यात आला.

लोकार्पण सोहळ्यास रोटरी क्लब निगडीचे अध्यक्ष मुनगेसर, सचिव गुरुदीपसिंग सर, संचालक आमोल जाधव सर तसेच रोटरी क्लब भोरच्या अध्यक्षा राजश्री शेटे, सचिव सुनील शेटे, संचालक विनय कुलकर्णी, रविंद्र पवार आणि भावी अध्यक्ष रुपेश चंदनशिव उपस्थित होते. यावेळी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मंडळ घोरपडेवाडीचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमामुळे घोरपडेवाडीतील नागरिकांना शुद्ध, सुरक्षित व आरोग्यदायी पिण्याचे पाणी उपलब्ध होणार असून, ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी दीपक घोरपडे यांचे विशेष सहकार्य लाभले असून, उपस्थितांनी त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

shivshahilive
Author: shivshahilive

राशिफल
सोने चांदी
हवामान
क्रिकेट