November 5, 2026 1:09 pm

Join WhatsApp Group
🟢

Join Our WhatsApp Group

Breaking News & Daily Updates Directly on WhatsApp

JOIN WHATSAPP GROUP
Join WhatsApp 🟢 JOIN WHATSAPP GROUP

वाढदिवसानिमित्त अन्नदान व अनाथ विद्यार्थ्यांना धान्य-खाऊ वाटप; समाजासमोर प्रेरणादायी आदर्श

प्रतिनिधी: प्रशांत साळवे ( मलठण, ता. शिरूर, जि. पुणे )

शिरूर : वाढदिवस हा केवळ आनंद साजरा करण्याचा दिवस नसून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडण्याची संधी आहे, हा संदेश देत सामाजिक कार्यकर्ते सलमान पठाण यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त शिरूर येथील स्वामी विवेकानंद आश्रम शाळेत अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित केला. यावेळी आश्रमातील अनाथ विद्यार्थ्यांना धान्य तसेच खाऊचे वाटप करून वाढदिवस अत्यंत साधेपणाने आणि सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्यात आला.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. वाढदिवस समाजोपयोगी पद्धतीने साजरा करण्याचा हा उपक्रम उपस्थितांनी कौतुकास्पद असल्याचे सांगितले आणि अशा सामाजिक कार्यातून इतरांनीही प्रेरणा घ्यावी, असे मत व्यक्त केले.या प्रसंगी लगड सर, वरून सर, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती आयेशा सय्यद, नगरसेवक संतोष थेऊरकर, कलीम सय्यद, स्वामी विवेकानंद आश्रम शाळेचे मुख्याध्यापक जाधव सर, जावेद सय्यद, शहानुर खान, आमन खान तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.समाजात वाढदिवस साजरा करण्याची सकारात्मक परंपरा रुजावी आणि गरजूंच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणारे असे उपक्रम अधिकाधिक व्हावेत, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

shivshahilive
Author: shivshahilive

राशिफल
सोने चांदी
हवामान
क्रिकेट