प्रतिनिधी: प्रशांत साळवे ( मलठण, ता. शिरूर, जि. पुणे )
सोने सांगवी गावातील अनुसूचित जाती जमातीचा सभा मंडप भ्रष्टाचार प्रकरणी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट साहेब यांनी समाज कल्याणचे आयुक्त व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना चौकशीचे आदेश दिलेले आहे .
याप्रकरणी तक्रारदार अमोल बोऱ्हाडे यांनी दिनांक 30 जून रोजी मुंबई येथे जाऊन भेट घेऊन सर्व पुरावे व वस्तुस्थिती प्रत्यक्ष सादर करून,त्यानंतर स्वतः लक्ष घालून त्यांनी याप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहे…
याप्रकरणी सर्व वस्तुस्थिती पाहिली असता सभा मंडप हा अनुसूची जाती व जमातीसाठी मंजूर झाला होता ,परंतु २०२२ साली तत्कालीन ग्रामपंचायत यामध्ये चुकीच्या पद्धतीने ठराव घेतला, चुकीची जागा दाखवली, बनावट कागदपत्रे तयार केली, प्रत्यक्ष दर्शनी कागदावर एक व वस्तुस्थिती अशा पद्धतीने सभामंडप हा दुसऱ्या जागेवर बांधण्यात आलेला होता .
२०२२ साली तत्कालीन ग्रामसेवक यांच्या कार्यकाळात चुकीचा ठराव तत्कालीन ग्रामसेवक यांच्या कार्यकाळात गट नंबर २३३ चा ग्रामपंचायत ठराव घेऊन त्यावर सभा मंडप बांधण्यासाठी ठराव मंजूर करण्यात आला, परंतु बौद्ध वस्तीचा गट नंबर हा ९ होता प्रत्यक्ष दर्शनी नकाशा हा गट नंबर नऊचा व रमाई आंबेडकर नगरचा देण्यात आला मग सभा मंडप हा गट नंबर ९ मध्ये न बांधता ग्रामसेवकांना काय मिळाले हा संशोधनाचा विषय आहे…

तत्कालीन ग्रामसेवकांनीसभा मंडप हस्तांतरण करण्याचा ठराव केलाच नाही.
२०२२साली तत्कालीन ग्रामसेवक यांनी सभामंडपाचे भूमिपूजन केले त्यावेळेस त्यांनी हा सभा मंडप बौद्ध वस्तीत न बांधता दुसऱ्या ठिकाणी बांधले त्यावेळेस उद्घाटनाला स्वतः खंबायात ग्रामसेवक व तत्कालीन सरपंच उपस्थित होते . याच ग्रामसेवकांनी ठरावावर सरपंचाची सही नसताना देखील हस्तांतरणाची प्रक्रिया पार पाडली यामध्ये चालू ग्रामसेवकांच्या काळात ग्रामपंचायतचे मासिक मिटींगचे दप्तर गायब…

सोने सांगवी चे सध्याचे ग्रामविकास अधिकारी चितळकर मॅडम यांच्या कार्यकाळात मासिक मीटिंगची प्रोसिडिंग रजिस्टर हे गायब झालेले होते ज्यावेळेस सभामंडपाच्या ठराव व हस्तांतरण ठराव याची मागणी तक्रारदार अमोल बोराडे यांनी केली त्यावेळेस त्यांनी पंधरा दिवस टाळाटाळ करून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला ,परंतु ज्या वेळेस सरपंच रेखाताई काळे यांनी ग्रामसेवकांना गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले त्यावेळेस दोन दिवसात मा.खंबायत ग्रामसेवक यांच्याकडे दप्तर असून जमा करतील असे सांगण्यात आले .

खरंच ग्रामपंचायतीचे दप्तर हे ग्रामसेवकांना ग्रामपंचायतच्या बाहेर नेण्याचा अधिकार आहे का ,
हा प्रकार अतिशय गंभीर असुन यामध्ये सध्याचे ग्रामसेवक सामील आहेत का ? याचा सुद्धा शोध घेणे गरजेचे आहे… तत्कालीन सरपंच यांनी ग्रामसेवकांना हाताशी धोरण सभामंडपाची जागा बदलली
तत्कालीन सरपंच यांनी चुकीचा ठराव, चुकीची जागा व कागदपत्रांमध्ये अपरातफर करून हा सभामंडप बांधलेला आहे ,त्यावेळेस ग्रामसेवकांच्या हाताशी धरून बुद्ध वस्तीचा सभा मंडप हा लाटण्याचा प्रयत्न कशासाठी करण्यात आला हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे . हे करून सरपंच काय साध्य केले याविषयी नागरिकांमध्ये कुतूहल आहे . असे अनेक प्रकरण आहे त्यामध्ये सूचक व अनुमोदक यांना आपण कोणते ठराव केलेले आहे हेच माहिती नाही विस्तार अधिकारी गावडे साहेब यांनी ग्रामपंचायतला भेट देऊन माहिती घेतली.

सभामंडपा प्रकरणी व ग्रामपंचायत सोनी सांगवी येथील दप्तर उपलब्ध नसल्याप्रकरणी तक्रारदार अमोल बोऱ्हाडे यांनी गटविकास अधिकारी गावडे साहेब यांच्याकडे तक्रार केली होती त्या अनुषंगाने त्यांनी ग्रामपंचायत मध्ये भेट देऊन सदर वस्तुस्थिती पाहिली असता ग्रामपंचायतीमध्ये दप्तर नव्हते हे ग्रामसेवकांनी यांच्यासमोर मान्य केले तसेच सभामंडपाच्या ठरावामध्ये खाडाखोड आहे हे सुद्धा पाहिले आहे ग्रामसेवकांना यावेळेस ग्रामपंचायतच्या सर्व कागदपत्रांकडे लक्ष देऊन सर्व कागदपत्रे व्यवस्थित ठेवण्याचा आदेश देण्यात आलेले आहे
सोने सांगवी ग्रामपंचायतच्या कोणत्याही ठरावावर सूचक व अनुमोदक यांची कसल्याही प्रकारची स्वाक्षरी नाही त्यामुळे अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने ठराव हा लागू होतो का व होत असेल तर त्याचे लेखी उत्तर गटविकास अधिकारी यांनी देण्यात यावे.



