November 5, 2026 2:16 pm

Join WhatsApp Group
🟢

Join Our WhatsApp Group

Breaking News & Daily Updates Directly on WhatsApp

JOIN WHATSAPP GROUP
Join WhatsApp 🟢 JOIN WHATSAPP GROUP

हरवलेली वस्तू परत मिळणे हा आनंद असतो; पण ती प्रामाणिकपणे परत करणारेच समाजातील खरे आदर्श असतात

प्रतिनिधी: प्रशांत साळवे ( मलठण, ता. शिरूर, जि. पुणे )

जिजामाता गार्डन परिसरात कुटुंबासोबत फिरण्यासाठी आलेल्या सौ. अस्मिता पोटघन यांची रोख रक्कम व महत्त्वाची शासकीय कागदपत्रे असलेली पर्स हरवली होती.

ही पर्स सैनिक सोसायटी येथील सौ. सालके काकू, सौ. भोसले काकू आणि सौ. प्रियंका गदादे यांना सापडली. त्यांनी तत्काळ महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. आयेशा कालिम सय्यद यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर संबंधितांचा शोध घेऊन पर्समधील सर्व रक्कम व कागदपत्रांसह सुरक्षितपणे त्यांच्या स्वाधीन करण्यात आली.

यावेळी अभिजीत पाचरणे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. आयेशा कालिम सय्यद, प्रितम पाटील साहेब, नगरसेवक मा. सागर नरवडे, नगरसेवक मा. निलेश पवार, नगरसेवक मा. उमेश शेळके, नगरसेवक मा. निलेश गाडेकर तसेच कालिम सय्यद यांच्या उपस्थितीत पर्स संबंधित महिलेकडे सुपूर्द करण्यात आली.

याप्रसंगी सौ. अस्मिता पोटघन यांनी सर्व उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले.

प्रामाणिकपणा, सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीची जपणूक करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन!

shivshahilive
Author: shivshahilive

राशिफल
सोने चांदी
हवामान
क्रिकेट