November 5, 2026 1:29 pm

Join WhatsApp Group
🟢

Join Our WhatsApp Group

Breaking News & Daily Updates Directly on WhatsApp

JOIN WHATSAPP GROUP
Join WhatsApp 🟢 JOIN WHATSAPP GROUP

राज ठाकरेंचा विश्वास नांगरे पाटलांवर निशाणा

नागपूर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील सध्या एका नव्या चर्चेत सापडले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यक्रमात सहभाग घेऊन त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेल्या स्तुतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असताना,

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक पोस्ट शेअर करत विश्वास नांगरे पाटील यांच्यावर कडक शब्दांत टीका केली आहे.राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये काय म्हणाले “पक्षांसमोर सद्सद्विवेक बुद्धी गहाण टाकू नका”विश्वास नांगरे पाटील यांच्या कार्यक्षमतेचे कौतुक करत त्यांना सल्ला दिला. “नांगरे पाटील असोत किंवा अजून कोणी असोत, माझी ही विनंती आहे की जर तुम्ही सरकार किंवा त्यांच्या मागच्या संघटनांच्या मागे धावलात, तर त्यांना हे हवंच आहे. परंतु नांगरे पाटील, तुम्ही एक चांगले आणि कार्यक्षम अधिकारी आहात; तुम्ही तरी तुमची सद्सद्विवेक बुद्धी राजकीय पक्ष आणि संघटनांसमोर गहाण टाकू नका.” असे राज ठाकरे यांनी म्हटले “वर्दीचा खाकी रंग पोलीस दलाचा की संघाचा?” हा प्रश्न ही उपस्थित केला राज ठाकरे असे म्हणाले की ते एक पोलीस अधिकारी आहेत आणि त्यांची निष्ठा फक्त आणि फक्त पोलीस दलाच्या कर्तव्याशी असायला हवी.

त्यापुढे राज ठाकरे यांनी नांगरे पाटील यांना असा असा सल्ला दिला की राजीनामा देऊन भाजपमध्ये जा: “तुम्हाला जर संघाबद्दल इतकीच आपुलकी असेल, तर ती मनात ठेवा. जर जाहीरपणे बोलायचे असेल, तर सेवेचा राजीनामा द्या आणि संघात किंवा भाजपमध्ये सामील व्हा. सध्या मर्जीतल्या अधिकाऱ्यांसाठी पुनर्वसन हमी योजना सुरूच आहे, तुमचेही पुनर्वसन होईल

राज ठाकरेंचा खाकी रंगावरून टोला: “नांगरे पाटील यांच्या वर्दीचा जो खाकी रंग आहे, तो पोलीस दलाचा आहे असा आमच्या सगळ्यांचा समज होता; तो रंग संघाच्या आधीच्या चड्डीच्या खाकीचा आहे, हे आम्हाला आत्ताच कळले.”राज ठाकरेंनी केवळ नांगरे पाटील यांच्यावरच नाही, तर सरकारवरही निशाणा साधला आहे. दुहेरी निष्ठा कशी चालते?: “अशी दुहेरी निष्ठा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना कशी चालते? उद्या तुम्ही सत्तेवरून गेल्यानंतर दुसऱ्या एखाद्या संघटनेच्या कार्यक्रमाला कोणताही अधिकारी गेला, तर तेव्हा बोंब मारू नका. अधिकाऱ्याच्या कृतीवर गप्प बसणे हेही एकप्रकारे तिचे समर्थनच आहे.” असे ही ते बोलले.

shivshahilive
Author: shivshahilive

राशिफल
सोने चांदी
हवामान
क्रिकेट