November 5, 2026 12:18 pm

Join WhatsApp Group
🟢

Join Our WhatsApp Group

Breaking News & Daily Updates Directly on WhatsApp

JOIN WHATSAPP GROUP
Join WhatsApp 🟢 JOIN WHATSAPP GROUP

टाकळी हाजी (मळगंगा)मध्ये दिवसाढवळ्या थरार; वृद्ध महिलेचे दागिने हिसकावून चोरटा पसार!

प्रतिनिधी: प्रशांत साळवे ( मलठण, ता. शिरूर, जि. पुणे )

टाकळी हाजी (मळगंगा): टाकळी हाजी येथील साबळेवाडी (वाळुंजमळा) परिसरात २५ जून २०२६ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
साबळेवाडी परिसरात राहणाऱ्या शालन भीवराज कदम या वृद्ध महिला घरासमोर उभ्या असताना, हेल्मेट आणि मास्क घातलेला एक अज्ञात दुचाकीस्वार तेथे आला. त्याने वृद्ध महिलेच्या गळ्यातील १५ ग्रॅम सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून घेतले आणि त्यांना धक्का देऊन घटनास्थळावरून पोबारा केला.
ही घटना दिवसाढवळ्या घडल्याने गुन्हेगारांचा बंदोबस्त करणे हे आता स्थानिक पोलिसांसमोर एक मोठे आव्हान निर्माण झाले आहे. सध्या पोलीस उपनिरीक्षक गोविंद खटिंग साहेब या प्रकरणाचा तपास करत आहेत. आरोपीला पकडण्यासाठी पोलीस परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करत असून आरोपीचा कसून शोध घेत आहेत.
आपल्या परिसरात संशयास्पद व्यक्ती आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. महिलांनी घराबाहेर पडताना सतर्क राहावे आणि पोलीस प्रशासन या भागात गस्त वाढवून गुन्हेगारांचा शोध घेतील, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

shivshahilive
Author: shivshahilive

राशिफल
सोने चांदी
हवामान
क्रिकेट