November 5, 2026 1:17 pm

Join WhatsApp Group
🟢

Join Our WhatsApp Group

Breaking News & Daily Updates Directly on WhatsApp

JOIN WHATSAPP GROUP
Join WhatsApp 🟢 JOIN WHATSAPP GROUP

एकल महिलांचे सर्वेक्षण करून त्यांचे प्रश्न समजून घेण्याचा शिरूर नगरपरिषद महिला बालकल्याण समितीने केलेला प्रयत्न कौतुकास्पद

प्रतिनिधी : प्रशांत साळवे ( शिरूर, जि. पुणे )

शिरूर नगर परिषदेने एकर महिलांचे सर्वेक्षण करून त्यांचे प्रश्न समजून घेण्याचा केलेला प्रयत्न कौतुकास्पद आहे .एकर महिलांच्या पुनर्वसनासाठी सर्वांनी पुढाकार घेणे आवश्यक असून त्यांच्या समस्या व गरजांची स्वतंत्र यादी तयार करावी असे आव्हान सामाजिक कार्यकर्ते तथा राज्याच्या एकल महिला धोरण निर्धारण समितीचे सदस्य हेरंब कुलकर्णी यांनी दिला ,
शिरूर नगरपरिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने जुन्या नगरपरिषद कार्यालयात एकल महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ,त्यावेळी नगराध्यक्ष ऐश्वर्या अभिजीत पाचरणे, मुख्याधिकारी प्रीतम पाटील ,उपनगराध्यक्ष नितेश गादिया, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती आयेशा सय्यद , उपसभापती स्वप्नाली जामदार ,पाणीपुरवठा समितीचे सभापती डॉक्टर सुनिता पोटे ,लोकशाही क्रांती आघाडीचे अध्यक्ष रवींद्र धनक ,सामाजिक कार्यकर्त्या उषा वाखारे ,प्रत्यक्ष कंपनीचे राहुल बिराजदार ,राजेश पाटील महिला बालकल्याण विभागाच्या शितल काळे, तसेच नगरसेविका व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या

यावेळी हेरंब कुलकर्णी म्हणाले की एकरमालांचे दुःख ,समस्या आणि सामाजिक आर्थिक अडचणी दूर करण्याची समाज व सरकारने संवेदनशील पणे पुढाकार घेत त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहिले पाहिजेत असे आव्हान सामाजिक कार्यकर्ते व राज्याच्या एकल महिला धोरण समितीचे सदस्य हेरंब कुलकर्णी यांनी केली .
अनेक महिलांकडे विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे नसतात ,ती कागदपत्रे त्यांना सहज उपलब्ध करून देण्याची व्यवस्था शासनाने करावी ,तसेच विधवा महिला संदर्भातील समाजातील जुन्या ,वाईट प्रथा परंपरा सोडून देण्याची गरज असल्याचे सांगत त्यांनी एकल महिलांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हेच त्यांच्या पुनर्वसनाचे प्रभावी माध्यम असल्याचे नमूद केले .

नगराध्यक्ष ऐश्वर्या प्रकरणी यांनी सांगितले की एकल महिलांच्या समक्ष करण्यासाठी तसेच त्यांच्या हक्क अधिकार आणि शासकीय योजनांची माहिती पोहोचवण्याच्या दृष्टीने हा उपक्रम राबवण्यात आला. शासनाच्या विविध कल्याणकारी योजना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी बचत गट ,आर्थिक स्वावलंबन ,आणि महिलांसाठी उपलब्ध सुविधांची माहिती तज्ञांकडून देण्यात आली .
तसेच महिलांना त्यांच्या समस्या अडचणी आणि अपेक्षा मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले.
एकल महिलांच्या सर्वांगीण विकाससाठी शिरूर नगरपरिषद कटीबद्ध असून त्यांना सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम राबवणार असे त्यांनी स्पष्ट केले .

कार्यक्रमात उपस्थित महिलांनी विविध विषयांवर आपले मते मांडत आपल्या अडचणी प्रशासनासमोर मांडल्या. या कार्यक्रमांतर्गत शिरूर शहरातील सुमारे 511 महिलांची नगरपालिकेने एकल महिला म्हणून नोंदी घालून त्यांना शासनाच्या विविध योजना मिळवून देण्याचे आश्वासन दिले

shivshahilive
Author: shivshahilive

राशिफल
सोने चांदी
हवामान
क्रिकेट