November 5, 2026 2:15 pm

Join WhatsApp Group
🟢

Join Our WhatsApp Group

Breaking News & Daily Updates Directly on WhatsApp

JOIN WHATSAPP GROUP
Join WhatsApp 🟢 JOIN WHATSAPP GROUP

लोहगड किल्ल्याच्या बदनामीविरोधात गरुड झेप मोहीमचे अध्यक्षअॕड. मारुती (आबा )गोळे यांची प्रतिक्रिया

प्रतिनिधी: श्री.राजेश महांगरे ( भोर ,जि. पुणे )

अलीकडे लोहगड किल्ल्यावर घडलेल्या एका निंदनीय घटनेनंतर सोशल मीडियावर किल्ल्याच्या नावाशी संबंधित विनोदी रील्स, मीम्स आणि थट्टामस्करीचे प्रमाण वाढले आहे. या प्रकाराबाबत इतिहासप्रेमी, दुर्गसंवर्धक आणि शिवप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

त्यांच्या मते, संबंधित घटनेतील दोषींवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. मात्र, त्या निमित्ताने लोहगडसारख्या ऐतिहासिक दुर्गाची बदनामी करणे योग्य नाही. लोहगड हा स्वराज्याच्या इतिहासाचा साक्षीदार असून त्याने मावळ्यांचा पराक्रम आणि संघर्ष अनुभवला आहे. त्यामुळे एका विकृत गुन्ह्याशी किल्ल्याची ओळख जोडणे हा इतिहासाचा अवमान असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.

इतिहास अभ्यासकांचे म्हणणे आहे की, गुन्हा करणारे व्यक्ती असतात, गड-किल्ले नाहीत. त्यामुळे केवळ व्ह्यूज, लाईक्स आणि प्रसिद्धीसाठी ऐतिहासिक वारशाची थट्टा करणे टाळले पाहिजे. अशा प्रकारच्या पोस्टमुळे तरुण पिढीमध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो, अशीही चिंता व्यक्त करण्यात आली.

यावेळी दुर्गप्रेमींनी सर्व नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, महाराष्ट्राच्या ऐतिहासिक गड-किल्ल्यांचा सन्मान राखावा आणि सोशल मीडियावर जबाबदारीने वागावे. “गडांचा सन्मान करा, इतिहासाची थट्टा करू नका” असा संदेश यानिमित्ताने देण्यात आला. 🚩

shivshahilive
Author: shivshahilive

राशिफल
सोने चांदी
हवामान
क्रिकेट