प्रतिनिधी : प्रशांत साळवे ( शिरूर, जिल्हा.पुणे )
शिरूर शहरातील महिला, विद्यार्थिनी आणि बालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरात विशेष “दामिनी पथक” कार्यान्वित करण्यात यावे, अशी मागणी शिरूर नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती तथा नगरसेविका आयेशा कलीम सय्यद यांनी केली होती याबाबत त्यांनी शिरूरचे पोलिस निरीक्षक संदेश केजेंळे यांना निवेदन देत महिला सुरक्षेचा गंभीर प्रश्न उपस्थित केला होता.

सध्या सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेबाबत नागरिकांमध्ये चिंता निर्माण होत असून काही ठिकाणी छेडछाड, गैरवर्तन तसेच महिलांना असुरक्षित वाटत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे शिरूर शहरात स्वतंत्र “दामिनी पथक” सुरू करून शाळा, महाविद्यालय परिसर, बसस्थानक, बाजारपेठ तसेच गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी नियमित गस्त घालण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती .

हे पथक कार्यान्वित झाल्यास महिलांना व विद्यार्थिनींना सुरक्षित वातावरण मिळण्यास मदत होईल. तसेच महिलांवरील गैरप्रकारांना प्रतिबंध होऊन नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ होईल, असा विश्वासही आयेशा सय्यद यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायती व औद्योगिक नगर अधिनियम १९६५ अंतर्गत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनावर असल्याचेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

त्यामुळे शिरूर शहराच्या दृष्टीने महिला व बालकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत “दामिनी पथक” तात्काळ सुरू करण्यात यावे, अशी ठाम मागणी नगरसेविका आयेशा कलीम सय्यद त्यांनी केली आहे. परंतु मध्यंतरी पोलिस खतातील अंतर्गत बदली झाल्यामुळे नवीन पोलिस निरीक्षक मा. विनोद पाटील सर यांनी शिरूर येथे चार्ज घेतला आणि काही दिवसात दामिनी पथक सुरू केले, महाविद्यालय परिसर, शाळा परिसरात, बस स्थानक परिसरात काल सर्व महिला, विद्यार्थी यांच्या समस्या समजावून घेतल्या आहेत. रोड रोमिओ आणि दारू पिऊन गाडी चालवणारे यांना आळा बसणार आहे. तसेज शिरूर शहरातील अनेक गंभीर समस्या सुटणार असल्याचे पोलिस निरीक्षक मा . पाटील सर यांनी सांगितले.!!!



